हिंदू तत्वाज्ञाच्या वेदांत शाखेचे पुरस्कर्ते आणि सर्व भारतीयांचे प्रेरणापुरुष स्वामी विवेकानंदांची येत्या १२ जानेवारी रोजी जयंती आहे. त्यांचा जन्मदिवस हा ‘युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त दि. १२ जानेवारी २०१९ रोजी ‘युवोन्मेष’ हा कीर्तनपरंपरा उलगडणारा एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ह.भ.प. विकासबुवा दिग्रसकर हे आपल्या खास शैलीत कीर्तनपरंपरेची महती युवा पिढीला सांगणार आहेत. शनिवार दि.१२ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता सदाशिव पेठ येथील पुणे विद्यार्थी गृहाच्या राम मंदिरात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. जास्तीत जास्त युवा वर्गाने या कार्यक्रमाला उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
लेखक:
No comment