Primary tabs

विठ्ठला

share on:

विठठला 

युगे अठ्ठाविस, विटेवरी उभा,

आता तरी मौन, सोड विठठला.

पाण्यासाठी जीव, आसुसला बापा,

पाऊसाचं गिर्हाण, सोड विठठला.

 

टाकूनिया मान, मोडले शरीर,

थेंबाला महाग, पिकं विठठला.

जन, जनावरं, सैर भैर झाली,

शोधतात आता, इखं विठठला.

 

मिटूनिया डोळे, ध्यान तुझे सुरू,

किती तू करशी, घाव विठठला?

जागुनिया आता, वाचव तू प्राण,

चमत्कार तुझा, दाव विठठला.

 

चिंतेचे काहुर, माजले अंतरी,

येऊ दे थोडीशी, तरस विठठला.

भक्तीचे वादळ, दाटले पंढरी,

होऊनिया ढग, बरस विठठला.

 

लागली पणाला, तुझीच थोरवी,

नको राहू शांत, भांड विठठला.

भ.ना. म्हणे तुझी, जाणतो श्रीमंती,

चंद्रभागा तुझी, सांड विठठला.

 

- प्रा.बी.एन.चौधरी.

    

लेखक: 

No comment

Leave a Response