Primary tabs

तू कोण, कुठली...

share on:

गं तू कोण, कुठली आणि का आली आहेस?
अशी अचानक ..
तू कधीच नव्हतीस या कवितेत, 
या कवितेच्या विचारांत 
आता माझ्याकडून काय अपेक्षा आहे तुझी ?

या कवितेची कुणी नव्हतीच नायिका 
तर तुझं काय करू मी ?
कवितेच्या नायकावर भाळून आलीस का गं ?

गं तू बोल 
येतं ना बोलता तुला 
येतं का बोलता तुला ..
की बहिरी आणि म्हणून मुकी पण आहेस ..

नको राहूस उभी अशी नुसतीच 
उत्तरं द्यायलाच हवीत तुला
इतका वेळ नाहीये कुणाकडेच 
तुझ्या संदर्भातल्या प्रश्नांची उकल करायला... 

तुझ्यापायी मी कविता कशी बदलू ?
बदल इतका स्वीकार्य असण्याची सवय नाहीये इथे कुणालाच 

गं तू जा इथून 
आल्या वाटेवर किंवा नवीन हुडकून काढ 
आणि अशी इथे तिथे तिथे फिरत जाऊ नकोस 
 खाली मानेने देखील.. 

एक ऐकशील 
भीति वाटू द्यावी गं 
कधीतरी स्वतःला स्वतःचीच .....

- अभिरूची

लेखक: 

No comment

Leave a Response