Primary tabs

स्वागत नववर्षाचे

share on:

सणाचा आनंद उत्साह मनात
साजरे होते नववर्ष माझ्या भारतात..
नव वर्षाचा  हो सण वसंतात आला
नव्या हंगामाची स्वप्ने पाहत तरारला..
माझिया देशाची समृद्ध संस्कृती
तिच्या अंगाखांद्यावरी फुलून येते प्रिती
कुणी म्हणती उगादी कुणी म्हणती पाडवा
रूजे प्रत्येकाच्या मनी सणाचा गोडवा 
कुणी सजवितो गुढी कुणी मांडती तबक
नववर्ष स्वागताचे प्रत्येका कौतुक
कुणी हिमालया कुशी कुणी नदीच्या किनारी
माझ्या देशाच्या मस्तकी सणासुदीच्या झालरी
कुणी ढोल वाजविती कुणी गाती अन् नाचती
कुणी पंचांग वाचून पूजिती देवमूर्ती
कुणी मंदिरात जाती देवदर्शन करिती
कुणी दानधर्मातूनी  सत्कार्य साधिती
कुणा दारी झुले हत्ती कुणा दारी हो तोरण
रांगोळीच्या रंगातूनी देती आनंदा आवताण
असा सण देशाचा,सूर्यऊर्जेचा सोहळा
मनांच्या मनांशी ,गुंफूनी जातो माळा

- डॉ. आर्या जोशी. 

yuvavivek@gmail.com

लेखक: 

No comment

Leave a Response