Primary tabs

सुर्वेमास्तारांना पत्र

share on:

किती दिवस झाले 

सुर्वे तुम्ही भेटला नाही 

कवितेत अंगार अजून पेटला नाही 

माझे विद्यापीठ म्हणत 

तुम्ही बरेच काही मांडले होते 

वाचून हडबडलेले कैक जणू

त्यांच्या पीठात पाणी सांडले होते 

भाकरीचा चंद्र शोधण्यात 

बरबाद झालेलीच जिंदगी 

कवितेत तुम्ही आणली 

घाम गाळणारांनी 

तुमची कविता जाणली 

आता शेतकरी, श्रमिक 

गरिबांचा कवी 

कोठे शोधावा ते कळेना?

कविता आम्ही सारेच लिहितोय 

पण आमच्या कवितेत 

वास्तवाचा प्रखर अंगार काही जळेना 

सुर्वे आमची विद्यापीठं 

आता आमची राहिली नाहीत 

ज्यांना दिला विचार तुम्ही 

त्यांनी तुमच्या आठवणींची 

अजून कधी फुले वाहिली नाहीत 

आई-बापाला विसरणारे कृतघ्न 

विचारवंत, विद्वान 

आता पावलोपावली भेटतात 

आपापल्याच कविता, धडे 

अभ्यासक्रमात रेटतात 

खूप झालंय अजीर्ण 

इथल्या रेटारेटीचं 

लिहीन म्हणतोय गाणं आता 

अंगार पेटविणाऱ्या रोटीचं !

                      --- अनिल बोधे 

लेखक: 

No comment

Leave a Response