Primary tabs

राष्ट्रपिता महात्मा गांधी

share on:

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना समर्पित 

विश्वास हिंसेचा अहिंसेनेच जिंका
जगण्यातुनी माझ्या जरी हरली अहिंसा!

जगलाच नाहिस तू स्वतःसाठी कधीही
आयुष्यभर केलीस देशाचीच चिंता!

मूर्ती जणू होतास तू सच्चेपणाची
झाला कुणाचाही कधी नाहीस मिंधा!

कौतूक झाले अन किती झाल्यात निंदा
पण थांबला धावायचा नाही परिंदा!

मारूनही गांधी कधी मरणार नाही
राहील जीवनभर तुझ्यामाझ्यात जिंदा!

*@ चंद्रकांत कदम (सन्मित्र)*
      9921788961

लेखक: 

No comment

Leave a Response