share

मी त्याला कधीही पाहिलं नाही. माझ्या जन्माच्याही आधी तो आमचं कामच काय चाळही सोडून गेला खरंतर. पण न बघता सुद्धा त्याची एक प्रतिमा बनली माझ्या मनात. धुवटसा खाकी किंवा तत्सम गडद रंगाचा हाफ शर्ट खाली हाफ पॅन्ट. तिरकी मान करून आपल्याच नादात चालणं. तंबाकूचा लावलेला बार. पायांत करकर वाजणाऱ्या कोल्हापुरी वहाणा. कधी हसला तर नवल असा सतत आपल्याच नादात हरवलेला बराचसा तिरसट चेहरा. डोक्यावर विरळ झालेल्या पण काळ्या केसांना छान खोबरेल तेलं लावून पाडलेला भांग. आणि त्यांना अधून मधून सतत आहे त्याच जागी बसवण्याची ढब. असच काहीसं चित्र, कोण जाणे माझ्या तरी डोळ्यांसमोर येतं.

Pages