share

स्वत्व

 मी जाणून असते
तुझ्या झेपेचं सामर्थ्य
माझे "गरुडपंख" मी कापून टाकते ...

 मला ठाऊक असते
तुझ्या वेगाची मर्यादा
मी माझा वेग कमी करते ...

मला माहीत असतो
तुझा पुरुषी अहंकार
मी स्वाभिमान बाजूला ठेवते ....

हळूहळू माझ्या लक्षात येते
माझी प्रत्येक माघार
तुला तुझेच यश वाटते ....

मग मात्र अपरिहार्यपणे
मला माझे स्वत्व
दाखवून द्यावेच लागते ...

 
कविता क्षीरसागर

Pages