share

 ज्या क्षणाची हिंदू जनतेला प्रतीक्षा होती, तो क्षण 9 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईकरांनी अनुभवला. राज ठाकरे यांनी नागरिकत्व कायदाला पाठींबा देण्यासाठी विशाल मोर्चा काढला. वर्तमानपत्रांनी त्याचे वर्णन 'भगवे वादळ' या शब्दात केले. राज ठाकरे यांनी मोर्चात सहभागी झालेल्या तमाम हिंदूंना म्हणजे राष्ट्रवादी नागरिकांना उद्देशून भाषण केले. या भाषणाचे महत्त्वाचे अंश वर्तमानपत्रांतून आले आहेत. असंख्य लोकांनी दूरदर्शनवरून हे भाषण प्रत्यक्ष ऐकलेदेखील आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीतील हे भाषण आहे.

Pages