share

सर्वोच्च न्यायालयाने या दिवाळीत फटाक्यांवर बंधने घातली. त्यामुळे हिरमुसलेले सगळे अखेर भारतीय क्रिकेटच्या मैदानावरील आतशबाजीकडेच डोळे लावून बसले होते. क्रिकेटप्रेमींसाठी ही दिवाळीची सुट्टी खरी आनंददायी होती. कारण, एकीकडे पुरुष संघाने वेस्ट इंडिजची केलेली दैना आणि दुसरीकडे महिला संघाची विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल राहण्याची लढाई. त्यातच मग दिवाळी दणक्यात सुरुवात केली ती रोहित शर्माने. वेस्ट इंडिज विरोधात जे काही सुतळी बॉम्ब त्याने फोडले, त्यामुळे यावर्षी फटाके न फोडताही रोहितच्या षटकारांनी ती भारतीय क्रिकेटप्रेमींची कसर भरून काढली.

Pages