share

'मैत्रिणींनो, स्वत:ची ओळख निर्माण करा, स्वावलंबी व्हा,' हे ब्रीदवाक्य जपत ग्रामीण महिलांमध्ये आत्मभान जागृत करणारे नेरळमधील ‘कोतवाल वाडी ट्रस्ट’चेच 'कर्मयोगी हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्र'. आर्थिक परिस्थितीशी झुंजणाऱ्या, अर्धवट शिक्षणामुळे आत्मविश्वास हरपलेल्या या महिलांसाठी शिवणकला आणि रुग्ण साहाय्यक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे कार्य या केंद्राद्वारे चालते. या सगळया कार्याचा आधारस्तंभ म्हणजे संस्थेच्या अध्यक्षा संध्याताई देवस्थळे.

Pages