share

संध्याकाळच्या सावल्यांची गंमत असते
एकटं असलं की 
दुसऱ्याची आठवण जागवतात
दुसरं कुणी आठवलं की 
एकटेपणाला हसतात
आणि 
हसत हसत अंधारात विरून जातात, मग
आपण होतो तसे राहतो,
म्हटलं तर एकटे, 
म्हटलं तर 
दुसऱ्याच्या आठवणीत जागलेले...

- अनघ

yuvavivek@gmail.com

Pages