share

शाळेत विज्ञान शिकताना मित्र तार्याचे नाव जवळपास प्रत्येकाच्या कानावर पडलं असेल. आपल्याला सूर्यानंतरचा दुसरा कोणता तारा जवळचा असेल तर तो म्हणजे मित्र तारा किंवा अल्फा सेंटौरी. पण मज्जा अशी आहे की ज्याला आपण मित्र तारा (अल्फा सेंटौरी) असं म्हणतो खरं तर तो तीन ताऱ्यांचा समूह आहे. अल्फा सेंटौरी ही एक ट्रिपल स्टार सिस्टीम आहे. सूर्यापासून जवळपास ४.३७ प्रकाशवर्ष (एक प्रकाशवर्ष म्हणजे साधारण ३ लाख किलोमीटर/ सेकंद या वेगाने एका वर्षात कापलेले अंतर) अंतरावर ही सिस्टीम आहे. यातले सर्वच तारे समान अंतरावर नाहीत.

Pages