Primary tabs

आणि कळी हसली : डॉ. शुभांगी सुनिल निकम

share on:

स्त्रीवादी कथालेखन स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त कथा...

आज ही ती उशिराच घरी परतत होती , निशांत तिला गल्लीच्या कोपर्यापर्यंत सोडुन गेला होता. ती खाली मान घालुन घरात प्रवेश करती झाली आणि खाडकन तिच्या डाव्या गालावर चार बोटे उमटली. ती भेलकांडली , बाजुला जावुन पड्ली चिडलेल्या वडिलांच्या चेहर्याकडे पहायची तिची हिम्मतच नव्हती.

हुंदका आवरतच ती आतल्या खोलीत शिरली आणि रडून रडून कधी झोपी गेली ते तिलाही कळलं नाही.

सुधाकरपंतांच्या डोळ्यात अंगार फुलत होता त्यांची नववीत गेलेली लेक आजकाल अशी वागते आहे हे कडक स्वभावाच्या बापाला पटतच नव्हते .त्यातच काल मोरेंच्या कॉलेजात जाणारया बंटी ने तीला कुणा टपोरी मुलसोबत घरी येताना दिसली होती नी तसे त्याने यांच्या कानावर घाट्ले होतेच. आणि आज एक मुलगा तीला कोपर्यापर्यंत सोडुन गेलेला त्यानी स्वत: पाहिला होता . ती काहितरी लपवत होती हे जाणवत होते त्याना.

घरात प्रचंड ताणाव निर्माण झाला होता. सुधाची आई रमा तिची तर बिशाद्च नव्हती नवर्यासमोर बोलायची.

रात्री उशिराच रमा सुधाजवळ गेली पोर रडून रडून झोपी गेली होती. रमाने तिच्या पाठीवरून मायेने हाथ फिरवला , आणि पोर दचकून उठली गुढ्गे पोटाशी घेवुन थरथर कापू लागली , घाबरुन रडू लागली समोर आई आहे याचेही भान तीला नव्हते . रमा चमकली काहितरी विपरीत घडले आहे याची जाणिव तीला झाली, तिने सुधाला रडू दिले .

बराच वेळ रडून झाल्यावर ती शांत झाली मग आई म्हणाली बाळ काय झालय तुला???? काही त्रास होतोय का ??? तू सांगीतले नाहिस तर कळणार तरी कसे ??? तो मुलगा कोन होता सोबत??? त्याने तुला काही केले का ??? रमाने लेकिला प्रेमाने जवळ घेतले आणि विचारले. तशी सुधा पुन्हा रडू लागली आई मला शिकायचे आहे ग ! बाबानां कळाले तर ते माझी शाळा बंद करतील आत्या सारखी पण पण...

यात माझी काहीच चुक नाहीय ग . .

आपण बाबांना समजावुन सांगू सुधा पण तू त्रास करून घेवु नको तुझी शाळा बंद होणार नाही बाळ सांग सुधा काय झालय?????

आई , आमचे गणिताचे जादाचे तास चालू आहेत तुला माहितच आहे की, पण या आठवड्या पासुन सर फक्त आम्हा सहा जणींचेच जादाचे तास घेत होते. आम्ही हुशार आहोत मग एक्स्ट्रा शिकवतो फक्त तुम्हालाच म्हणाले .

पण ते आमच्या हाताला हाथ लावुन शिकवायचे मग कधी डोक्यावरुन पाठीवरून हाथ फिरवायचे ,आम्हाला ते कसे तरीच वाटायचे आई ,कित्ती घाणेरड़ा स्पर्श होता त्यांचा मग पुढच्या दिवशी आम्ही क्लास चुकवला तर ते आम्हाला वर्गात खुप खुप ओरडले आणि क्लास साठी थांबायला सांगीतले, आमचा नाईलाज झाला आम्ही थांबलो पण पुन्हा त्यांचे तेच चाळे सुरु झाले आम्ही रडत होतो कापत होतो पण ते ते........ ती पुन्हा रडू लागली . आई एकत होती.

काल त्यानी त्या पाच जनिना सोड्ले आणि मला थांबवून घेतले, गणिताच सोडुन ते मला काही वेगळेच सांगत होते ते माझ्या डोक्यावरुन पाठीवरून हाथ फिरवत होते मी खुप रडत होते आई आणि आणि आमच्या वर्गातला निशांत आला आचानक तिथे आणि सर बाजुला झाले ते त्याला रागवत होते मी' ढ ' पोरांचा तास घेत नाही अस म्हणत होते मी पट्कन दप्तर भरले आणि बाहेर पळून आले मी रडत होते आई मला निशांत ने पाणी दिले आणि तो मला घरापर्येंत सोडुन गेला . आज ही तोच प्रकार झाला माझी काहीच चुक नाही यात आई ..

शाळा सुटल्यावर निशांत ग्राउंड वर क्रिकेट खेळतो त्याच्या लक्षात आले पाच जणी गेल्या पण मी एकटी राहिले म्हणून तो वर्गात आला होता आई मला खुप किळस वाट्ते सरांची ,मला तास नको मला शाळा शिकायची आहे आई ..

आई ने लेकिला कुशित घेतले अजाणत्या वयात शरीर आणि मनावर झालेले आघात ही कोवळी पोर कशी सहन करत असेल या विचाराने रमा च्या डोळ्याला धारा लागल्या. माय लेकी रडत होत्या

आणि खोली बाहेर उभा असलेला तो कठोर बाप हादरला .आपल्या पिल्ला सोबत हे घडतय हे त्याच्या पचनी पडेना नकळत आपण काय काय विचार केला आपल्या लेकीने कित्ती सोसले हे विचार करून त्याच्या डोळ्याला धारा लागल्या.

दुसर्या दिवशी मलुल अशक्त सुधा शाळेत जायला तयार झाली नी सुधाकरपंतांचा आवाज आला

थांब ,सुधा !

पोर घाबरली डोळे पाण्याने भरले .

आज मी येतोय तुला शाळेत सोडायला बघू तरी माझ्या लेकिला कोन त्रास देतय ते. तक्रार करु त्या सरांची आपण . मी आहे सोबत तुझ्या.

सुधा घाबरु नको . आणि हो तुझ्या त्या वर्ग मित्रा ला ही भेटायच आहेच मला खुप धाड्शी आणि चांगला मुलगा आहे तो .

आई ने देवाला हाथ जोड्ले ,सुधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि एक कळी भयमुक्त हसली .

 

- डॉ. शुभांगी सुनिल निकम 

लेखक: 

No comment

Leave a Response