Primary tabs

कवी म्हणजे काय असतो

share on:

कवी म्हणजे काय असतो

कवी म्हणजे असतो सागर

विचारांची असते हो घागर

कवितेतून भाव व्यक्त करत असतो

घागर रिती करतच असतो

विचारात तो जातो दंगून

भाव मांडतो रंगवून रंगवून

व्यक्ती तितक्या प्रकृती असतात

साऱ्यांचे विचार कवितेत दिसतात

खूप कठीण असतं काव्य करणं 

प्रत्येकाचे भाव त्यात उतरवणं

कवितेची असते अशी अविट गोडी

विचार नि शब्दांची लावलेली जोडी

कवी म्हणजे असतो एक मधमाशी 

काव्याची गोडी चाखणारा अधाशी

मनातले विचार करतात अस्वस्थ

कविता मग होते खूपच मस्त

विचार सारखे सुचत असतात

काव्य किनारी फिरतच बसतात

भाव नौकेतून करताच विहार

कवितेला येतो खूपच बहार

नाव माझे आहे हो स्मिता

करतच राहणार मी कविता

-     स्मिता योगीराज कुलकर्णी

लेखक: 

No comment

Leave a Response