Primary tabs

दोन सख्या

share on:

दोन सख्या ह्या बिलगून बसती
हितगुज मनीचे जणू संगती
प्रसन्न होवूनी  खुदकन हसती
जग हे विसरून मौज करती
सुगंध प्रीतीचा  जगी उधळती
आतुर होऊन गुपित सांगती
गुणी अशी ही सखी मिळाली
ईशकृपेने  जिवलग बनली
जसे शोभती कृष्ण-सुदामा  
आणिक नको मज दुजी उपमा
जगाची मज नसे ग चिंता
जीवनभर तुझी साथ असता  
पाहुनी  तुजला प्रसन्न मम मन
असे बसू ग आपण बिलगून
 

लेखक: 

No comment

Leave a Response