Primary tabs

माय मराठी

share on:

माझ्या मराठीची गोडी 
नका काढू कुणी खोडी 
‘अ’ज्ञानाने सुरू झाली 
‘ज्ञा’नी करून थांबली 
पदर वेलांटीचा घेई  
उकाराचे पैंजण पायी 
काना  शोभतो सखा 
ओंकार मारीतसे हाका  
वळवू तशी ती वळते 
बाल मनालाही भिडते 
शब्द असे जरी एक 
अर्थ असती हो अनेक 
किती गावी तिची महती 
गमे  माझी माता असे ती 
मराठी माझी अमृततुल्य 
नका  करू तिचे मूल्य 

अनुस्वाराचे महत्त्व पाही 
एक शब्द तीन प्रकारे लिही 

लेखक: 

No comment

Leave a Response