Primary tabs

मैत्री

share on:

मैत्री असावी अशी कधी खुलवणारी
फुलपाखरासम  स्वच्छंद भिरभिरणारी
मैत्री असावी अशी गीत गाणारी
अन पानोपानी सळसळणारी
मैत्रीचा सुगंध हा असावा असा
सर्वांना तो वाटावा हवाहवासा
कधी रूसणारी कधी फुगणारी
अन क्षणातच परत हसणारी
निव्याज निरागस खळखळणारी
क्षणी भूवरी तर क्षणी नभी भिरभिरणारी
रूसवे फुगवे भांडण अन अबोला  
मैत्रित जागा कधी न याला
हसत  हसत  आपण जगावे
मैत्रित धुंदीत मस्त रमावे
न भेटताही आठवणी या जागवू
पण मनी आशा भेटीची ती ठेवू
मैत्री ही जीवनाचे सुंदर गीत
मैत्रीच जीवनाचे सुंदरसे स्मित  

- स्मिता योगीराज कुळकर्णी

लेखक: 

No comment

Leave a Response