Primary tabs

शब्दांचा खेळ

share on:

भावना ही शब्दाविना मांडू कशी? मांडू कशी ?
शब्द न सुचता तुझ्यासवे भांडू कशी?  भांडू कशी?
शब्द सुचण्या विचार करता
विचार हा करू कशी?
विचार करण्या मन हवे हे
आनंदी मन ठेवू कशी?
आनंद शोधण्या जाणार कुठे मी?
अंतरी तो शोधू कशी?
शोधण्या तो आस हवी ती आस ही लावू कशी
सांग सखे तुला शोधू कशी?
बावरले मी हरिणीवाणी
वनी उपवनी फिरणार कशी?
चंचल चपला जणू मन माझे
मनास मी आवरू कशी?
मन आवरण्या हवी भावना
भावना ही मांडू कशी ?
सूत शब्दांचे भावनेविना
मी सूर हे जुळवू कशी? जुळवू कशी?

- स्मिता योगीराज कुळकर्णी
 

लेखक: 

No comment

Leave a Response