Primary tabs

शब्दगंध

share on:

शब्द ब्रह्म हे शब्द सत्य हे शब्दच आहे नाद
शब्दाशब्दांमधून घडतो भावनांचा संवाद ||
शब्द गूढ हे शब्द गोड हे शब्दच करिती छल
शब्द द्वाड हे शब्द शस्त्र हे शब्द करिती उकल ||
शब्दाशब्दांमधून घडतो भावनांचा अविष्कार
शब्द जाणता शब्द नेणता होतो साक्षात्कार ||
शब्द मूर्त हे शब्द भाव हे करिती साकार
शब्द वाचता शब्द जगता भाव घेती आकार ||
शब्दांनी तो शब्द वाढतो मन होते जड
शब्द वाढता गूढ वाढते होते अवघड||
शब्द स्पर्श हे शब्द गंध हे असती हळुवार
राग प्रेम द्वेष मत्सर शब्दच अहंकार ||
शब्द रस हे शब्द माधुर्य शब्दच सौन्दर्य
शब्दांनी तो मिळे दिलासा वाढते मनी धैर्य ||
शब्द जपावे शब्दास जागावे काही कमी न गडे
शब्द स्मरता वचन स्मरता किमया काही  घडे ||
शब्दांचीच किमया सारी अन ती जादुगिरी
शब्द जपता अन तो स्मरता भुलली दुनिया सारी ||
शब्द कोमल शब्द कठोर शब्दच करिती वार
शब्दांचा होता मारा  जड होतो मनी भार ||
शब्दांचा हा खेळच न्यारा असे अपरंपार
शब्द किती हे गुंफू आता इथेच मी थांबणार ||
- स्मिता योगीराज कुळकर्णी

लेखक: 

No comment

Leave a Response