Primary tabs

बँकिंगमधल्या संधी 

share on:

बँकिंगमधल्या संधी 

 

भारत देशाची प्रगती अतिशय वेगाने होताना सर्वत्र दिसते. कुठलेही क्षेत्र घ्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. जिथे पैसा येतो, तिथे बँक येतेच कारण पैसा हा बँकेच्या माध्यमातून फिरत असतो. त्यामुळे साहजिकच बँकिंग सेक्टर मोठ्या प्रमाणात विस्तारित आहे, देशाच्या छोट्यातल्या छोट्या गावात, वाडीत देखील बँकिंग पोहोचवताना बँकेचा शाखा विस्तार होणे आवश्यक आहे. तसेच शहराच्या नव्याने विस्तारित झालेल्या भागात बँक शाखांची निकड जाणवते. बँकिंग प्रॉडक्ट्समध्ये विविधता वाढत आहे, त्याचा वापर वाढता आहे. अशा अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम बँकिंग सेक्टर विस्तारावर होतो. त्याची पूर्तता करताना मनुष्य बळ अधिकाधिक पाहिजे. परिणामत: मोठ्या संख्येने नोकरभरती बँकिंग सेक्टरमध्ये आहे. 

 

भारतीय रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया दोहोंची नोकरभरती कार्यप्रणाली स्वतंत्ररित्या त्या त्या बँकेकडून केली जाते. आजमितीस राष्ट्रीयकृत (nationalized) १९ बँका आहेत. त्यांना मनुष्य बळ पुरविण्याचे काम आयबीपीएस-शासकीय स्वायत्त भारती संस्था  (IBPS – Institute of Banking Personnel Selection – Government Autonomous Recruitment Body)  करते. त्यांचे मार्फत नोकरभरतीसाठी सामान्य प्रवेश परीक्षा (CWE – Common Entrance Exams) घेतल्या जातात. निवड प्रक्रिया तीन प्रकारे घेतली जाते – प्राथमिक परीक्षा (Preliminary exam.),   मुख्य परीक्षा (Main exam.) आणि मुलाखत (Interview).  त्यानुसार निवड झाल्यावर बँकेकडून नियुक्तीपत्र (Appointment letter) देण्यात येते.

 

बँकेत नोकरीसाठी आवश्यक पात्रता : 

भारतीय नागरिक असलेल्यांनाच फक्त घेतले जाते 

वय : क्लार्क २० ते २८ वर्षे : ऑफिसर २० ते ३० वर्षे 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पास 

यामध्ये बीसी/एसटी/ओबीसी; शारीरिक अपंग, माजी सैनिक अशा व इतर काहींना सवलती आहेत. प्रत्येकाने www.ibps.in या वेबसाईटवर सर्व तपशील बारकाईने बघून आपला ऑनलाईन अर्ज भरावा. सर्व  बारकावे ज्याचे त्याने बघितल्याने पुढे काही त्रास उद्भवणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी. फॉर्म भरतानाच फी भरायची असते. फॉर्म भरण्यापूर्वी वेबसाईटवर दिलेल्या सर्व सूचना, माहिती बघितल्याशिवाय पुढे जाऊ नये. 

 

यंदाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच त्यांनी घोषित केलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे : 

रिजनल रुरल बँक्स : RRB – Regional Rural Banks  :  ऑनलाईन फॉर्म भरायची शेवटची

   तारीख होती २१ जुलै.२०२०. परीक्षा –१३,१९ सप्टेंबर,२०२० 

PO : प्रोबेशनरी ऑफिसर: निवेदन-ऑगस्ट २०२  : प्राथमिक परीक्षा-३,४,१० ऑक्टोबर,२० 

        मुख्य परीक्षा – २८ नोव्हेंबर,२०. 

क्लार्कस:: निवेदन–सप्टेंबर,२० : प्राथमिक परीक्षा–१२,१३,१९ डिसेंबर,२०:मुख्य परीक्षा–

        २४  जानेवारी २०२१ 

SO : स्पेशल ऑफिसर:निवेदन-नोव्हेंबर,२०: प्राथमिक परीक्षा-२०,२७ डिसेंबर,२०: 

        मुख्य परीक्षा-३० जाने.२१ 

 

आयबीपीएसकडून वरील सर्व परीक्षा घेतल्या जातात. प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी पुढील मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी ठरतो. त्यातही पास झालेल्या सर्वांची मुलाखत घेतली जाते आणि त्यानंतर बँकेला नावे कळवली जातात. 

 

ऑनलाईन फॉर्म भरताना प्रत्येकाने आपल्याला कुठल्या बँकेत नोकरी करायची इच्छा आहे याचा क्रम लिहायचा असतो. पहिल्यांदा कुठली बँक हवी, ती नाही तर दुसरी कुठली असे करीत सर्व शेवटपर्यंत नावे लिहिणे सक्तीचे आहे. तोच विद्यार्थी मुलाखतीतून निवडला गेल्यावर त्याला मिळालेले मार्क्स आणि त्याने दिलेला बँकांचा क्रम यानुसार त्याचे नाव त्यात्या बँकेला कळवले जाते. बँक विद्यार्थ्याशी संपर्क करते. प्रत्यक्ष बँकेत जाऊन सर्व कागदपत्रे, सर्टिफिकेट तपासणी होते, त्यानंतर वैद्यकीय तपासणी होऊन त्यास बँकेत घेतल्याचे पत्र बँकेकडून मिळते. इथे क्लार्कला नोकरीमध्ये कायमस्वरूपी होतानाचा कालावधी (probation period) सहा महिने असतो तर ऑफिसरचा दोन वर्ष असतो.  

 

थोडक्यात आरबीआय व स्टेट बँक सोडून १७ बँका आवश्यक नोकर भरती करताना सर्वस्वी आयबीपीएसवर अवलंबून आहेत. काही सहकारी बँका देखील आयबीपीएसमार्फत नोकर भरती करतात. काही फक्त परीक्षा करून घेतात, आणि मुलाखती स्वत: घेतात.  

 

विद्यार्थ्यांनी अवश्य बँकिंग करिअर स्वीकारावे. हुशार, प्रमाणिक, जिज्ञासू, जबाबदारी स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांची बँकांना मोठी गरज आहे. त्यांचा फायदा घ्यावा, योग्य प्रकारे अभ्यास करून बँकिंग क्षेत्रात पदार्पण करावे. बँकर होऊन नव्या आयुष्याची सुरुवात करावी. यासाठी परीक्षेला बसणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. 

 

वंदना धर्माधिकारी 

लेखक: 

No comment

Leave a Response