Primary tabs

कृष्ण जन्म गीत - डाॅ. रेखा देशमुख

share on:

कृष्ण जन्म गीत

आठवा देवकी नंदन
जन्म आज झाला 
 गीत गाऊनी सजवू पाळणा
आनंदी आनंद गोकुळाला

दिन दिनी वाढता
बालमुकुंद लीला 
कधी माखनचोर 
कधी शाम सावळा 

बालमुखी देई दर्शन
दाखवुनी कृष्णलीला

दुग्धपान शोषुनी विषमय
मारले महाधुर्त पुतनेला

गोवर्धन उठवला
एका करंगळीवरी
कालिया नागाचे 
संकट दूर करी 

राधेचा चित्तचोर 
मनमोहन मुरलीधर
होई मग मीरेचा
घनश्याम आगळा

मित्रवर सुदाम्याचा
द्रौपदीचा भ्राता
करी शिशुपालवध
शत अपराध होता

अर्जुनाचा रथ सारथी
गीतेचे सार देता
रणनितीचा शिक्षक 
सर्वेसर्वा महा-भारता 

डाॅ. रेखा देशमुख

लेखक: 

No comment

Leave a Response