श्रावण
क्षणात पसरते उन्ह
क्षणात बरसती धारा
लेऊन हिरवा साज
श्रावण येतो दारा॥१॥
कमान ऐशी इंद्रधनुची
जणू थाटला सोहळा
वृक्ष डोलती आनंदे
झेलून श्रावण धारा॥२॥
सोहळा असा निराळा
वर्णू बघता शब्दात
निःशब्द होते मी अन्
श्रावण उरतो मनात॥३॥
- सुरश्री आनंद रहाळकर
लेखक:
No comment