Primary tabs

बाळमूठ

share on:

बाळमूठ

 

त्याच्या बाळमुठीतून अलगद

सोडून दिलंय त्याने, माझं बोट

अन् झेपावलाय, मोकळ्या जगात,

निर्धास्तपणे...

 

तो अजिबात घाबरत नाही आता अंधाराला,

मित्रमैत्रिणींचे वाढदिवस साजरे करून,

उशीरा घरी यायला....

तो एकटाच जातो लॉंग ड्राइवला...

कधी करतो नाईटआऊट मित्रांसोबत...

जमवतो मित्रमैत्रिणीं, मोकळेपणानं खिदळतो सुद्धा,

आमच्यासमोर....

सहज हात ठेवतो, बाबाच्या खांद्यावर,

आणि म्हणतो... ए बाबा तू दाढी वाढव ना, हँडसम दिसशील

आपली सगळी मतं, न संकोचता मांडतो..

तो आमच्यासमोर...

आता तर...

 जाणार आहे, एकटाच...

सातासमुद्रापार, शिकायला..

 

मला मात्र वाटतंय...

हे सारं माझा मुलगा नाही,

मीच जगतेय, त्याच्यातून...

 जे सारं मला ,कधीच नव्हतं मिळालं अनुभवायला, 'मुलगी' म्हणून.....

- चंचल काळे

लेखक: 

No comment

Leave a Response