Primary tabs

मैत्री...

share on:

मैत्री म्हणजे....
भावनांची ओंजळ हळूवारपणे भरणारी...
कधी-कधी एकमेकांसाठी
डोळ्यातील अश्रूंनी सजणारी...
मैत्री म्हणजे,
दु:खातही, हवेतल्या गारव्यापरी
मनावर सुखाचे मोरपिस फिरवणारी....
कधी ऊन, कधी सावली
तर कधी पाऊस होणारी...
आनंदाच्या सरींनी
रिमझिम रिमझिम बरसणारी...
मैत्री म्हणजे,
पारिजातकाच्या सुगंधापरी
हलकेच दरवळणारी....
कधी रडणारी, कधी रडवणारी
कधी चिडणारी, कधी चिडवणारी...
सागराच्या लाटांपरी
किनाऱ्याला भिडणारी....
मैत्री म्हणजे,
झाडावरील पालवी जणू
हिरवाईने नटणारी...
एका हक्काच्या मिठीने
क्षणात भांडणं मिटणारी...
मैत्री म्हणजे,
कधी हसता-हसता रुसणारी...
डोळ्यातील अश्रू पुसणारी...
घट्ट तरीही मोकळी वीण
कधीच न उसणारी...
डोळ्यावरील पापणी जणू
स्वच्छंदी हसणारी....
मैत्री म्हणजे
चहाच्या कट्ट्यावर मोकळेपणाने गप्पा मारणारी...
गप्पांच्या मैफिलीत
बेधुंदपणे रमणारी....
आम्ही आहोत तुझ्यासोबत
तू शिखर सर कर,
अशी स्पंदने मनी
जागवणारी....
मैत्री म्हणजे,
मनाच्या कोपऱ्यात
सुखाची गाणी गुणगुणणारी...
आयुष्याची कोरी पानं
आठवणींनी लिहिणारी.....!!
   - हर्षदा पिंपळे

लेखक: 

No comment

Leave a Response