Primary tabs

मोह मोह के धागे

share on:

 

पत्र क्र. ७

मीरा...

      ह्म्म्म..तरीही एकदाही तुला का नाही वाटावं मनात जे साचलंय ते ओकून टाकावं. वाटा वेगळ्या झाल्या पण नियती म्हणावी का ही दोन भिन्न मार्गानी जाऊनही आपण एकाच हमरस्त्याला आलो.

      मीरा,आपल्या आठवणी त्रासदायक होत्या का?आपलं एकत्र फिरणं,एकत्र राहणं, तुझे नको ते हट्ट हे सारं त्रासदायक होत का?जगण्याविषयीच्या तुझ्या कल्पना भन्नाट होत्या. खूप उशिरा मला त्या समजल्या. मीरा,लग्नानंतर मी पहिल्यांदा विस्की प्यायलो.ती कडवट विस्की गळ्याखाली उतरवताना तूच समोर होतीस माझ्या.मिश्किलपणे माझ्याकडे बघून हसत होतीस.विचारत होतीस नशेमधलं सुख कळतंय का? हो मीरा, तेव्हा कळत होत्या तुझ्या जगण्याविषयीच्या कल्पना.ही नशा बेधुंद करते बघ.साऱ्यापासून दूर नेऊन ठेवते अगदी आपल्या अस्तित्वापासून ही.काही क्षणासाठी का होईना पण ‘सुख’ ही कल्पना त्या नशेत अनुभवता येते.

     त्या रात्री तू नशेत होतीस.मी सुद्धा त्या रात्री का नाही प्यायलो ही चुकचुक अजूनही मनाला लागून आहे. त्या रात्री तुझ्यासोबत वाहवत गेलो पण ते क्षण तुझ्यासारखे मनापासून जगलो नाही. तीचएक रात्र होती मीरा, त्या रात्री तू खूप वेगळी होती.माझी रती.मीरा, हे सगळ त्रासदायक होतं का तुझ्यासाठी? तुझ्या या अशा वागण्याने मी उद्विग्न होतोय.मीरा, माझ्या मनात खूप प्रश्न आहेत पण त्याची उत्तर माझ्याकडे नाहीत.ही उत्तर तुझ्या या अशा वागण्यात आहेत. खूप काही बोलायचं आहे पण....

 

                                                                     सुहित..

त.टि - मनात साचलेला आठवणीचा कचरा एकत्र करून जाळून टाकला तरी राख मागे उरतेच.ही राख वाऱ्यासोबत उडून गेली तर अधांतरी न राहता पुन्हा मनाच्या जमिनीवरच विसावते. त्या राखेची धग तशीच ठेवावी की त्याला समाधानाचा ओलावा द्यावा हे आपल्या हातात आहे.मी काय बोलतोय तुला कळतयं ना?

- उत्कर्षा सुमित

लेखक: 

No comment

Leave a Response