Primary tabs

मोह मोह के धागे

share on:

पत्र क्र. ५
मीरा...
       ओह्ह्ह..काकीबद्दल ऐकून..आता सगळी जबाबदारी तुझ्यावरच असेल तर? राघवला नाही पाहिलं. मी फक्त तुलाच पाहत राहिलो. मीरा, तू प्रत्येकवेळी मला नव्याने भेटतेस. तुला पुन्हा नव्याने ओळखावं लागतं मला. मीरा, तुला खरंच भूतकाळाविषयी बोलावंस नाही वाटत का? माझं पहिलं पत्र तू किती सहजतेने घेतलंस. तुला काहीच विचारवंस नाही वाटत का मला?
तुला पत्र लिहिताना मला आपल्या भेटी, आपल्या गूजगोष्टी आठवतात. तुझ्या मनात हा आठवांचा थवा भरारी घेत नाही का? पहिल्या पत्रात मी म्हटलं, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे ते हेच सगळं गं..मला आज हीच उत्तर दे. उत्तराच्या प्रतिक्षेत..
                                                           सुहित

पत्र क्र. ६
सुहित,
         सोहू, बोलण्यासारखे खूप विषय आपल्याकडे असताना भूतकाळात अडकून का पडावं. जे क्षण निघून गेले त्याचा पुन्हा विचार तो का करावा? बरं, भूतकाळ आपल्याला सुख देत का? याचं उत्तर नाही असेल तर त्या क्षणचक्रात का अडकून पडायचं आणि आता तुझ्याकडून उत्तर घेऊन मी त्यांना मनाच्या कोणत्या कप्प्यात ठेवू. त्या उत्तरांच माझ्याशी काय नातं असणार?
    सोहू, एक निर्णय तुझा होता एक माझा. वाटा इथेच वेगळ्या झाल्या बघ. मी पुन्हा तुझ्या वाटेला तुझा शोध घेतला नाही तू ही माझ्या रस्त्याने प्रवास केला नाहीस. मग आता पुन्हा परतीचा प्रवास करून मागे जाण्यात काय अर्थ आहे जिथे आता काही शिल्लक नाही.
   मी फक्त आताच्या या क्षणामध्ये जगते. हा क्षण गेला की माझ्यासाठी तो भूतकाळ होतो. ज्या आठवणी त्रास देतात त्या आठवणी जपण्यात काहीच अर्थ नसतो. मला वाटत तू ही यात गुंतू नकोस. यातून निष्पत्ती काहीच नाही. थांबते.
         राघव हाक मारतोय. आज डिनरला बाहेर जायचा बेत आहे. पुन्हा बोलूच.
                                                             मीरा

-उत्कर्षा सुमित

लेखक: 

No comment

Leave a Response