Primary tabs

मन

share on:

कविता म्हणजे काय असते?

मनामधला भाव असते.

मन म्हणजे काय असते?

विचारांची तर नाव असते.

विचार का होतात सैरभैर?

कारण मन नसते थाऱ्यावर

मन माझे कसे गं आवरू

भावनारूपी असती तारू

शंका जेंव्हा मनात येते

मन खूपच अस्वस्थ होते

मनाचे असतात विविध रंग

पाहून सारे होतात दंग

क्षणी असते मजपाशी

तर क्षणी जाते आकाशी

मौजा याच्या सांगाव्या किती

सांगताना हे शब्द थकती  

 

- स्मिता योगीराज कुळकर्णी

No comment

Leave a Response