Primary tabs

घरी रहा सुरक्षित रहा!

share on:

आज तो खूप अस्वस्थ होता...
त्याच्यासमोर त्याच्या छोट्या मुलाला त्या टीमने उचलून नेलं होतं.. त्याचे छोटेसे, निरागस,तापाने लालसर झालेले डोळे त्याला आठवत होते आणि "बाबा!!! मला नाही जायचं ना.. बाबा मला घरीच खेळायचंय तुमच्यासोबत" असा पिळवटून टाकणारा आक्रोशही.

त्याला त्यादिवशीचं बायकोचं आणि त्याचं बोलणं आठवू लागलं.."अहो, नका नेऊ त्याला बाहेर प्लीज."

"तू किती घाबरट आहेस गं. काही होत नाही. एवढी लोकं बाहेर फिरतात. त्यांना काही होत नाही आणि आम्हाला काय होणारे?
हो की नाही चँम्प? तुझी ममा घाबरटच आहे नाही तरी."

आज त्याला वाटत होतं. कदाचित मी ही घाबरट असतो तर...आज माझ्या पिल्लाला जबरदस्तीनं, नाईलाजानं दूर व्हावं लागलं नसतं...
मी नको होतं जायला बाहेर..आता माझं पिल्लू मला परत जिवंतपणी बघता तर येईल ना?
त्याच्या काळजाला घरं पडत.होती. त्याला राहून राहून वाटत होतं..
मी घरी राहीलो असतो तर....

घरीच राहा आपल्या जिवलगांना वाचवा.
हे संकट महाभयंकर आहे. पण आपण सर्वांनी काटेकोर नियम पाळले तर ते तितक्याच पटकन निष्प्रभ होईल. अजून काही दिवसांत आपण आपल्या नेहमीच्या ख्यालीखुशालीने चाललेल्या आयुष्याकडे विनानुकसान परत जाऊ शकू.काळजी घ्या. घराबाहेर पडू नका.
- डॉ क्षमा शेलार

No comment

Leave a Response