माझ्या लाडक्या, कसा आहेस? मुद्दामच लाडक्या संबोधले तुला! अरे शरीराने अनंतात विलीन झालो असलो तरी मनाने तुमच्यातच विसावलो आहे रे! शेवटी माझा आत्मा तुम्हीच शेवटी काळजी वाटायची ना रे! असो..
करोनाचा कितपत उपद्रव आहे तुझ्या जवळपास? असे ऐकले की, करोनाने खूप थैमान घातले आहे पृथ्वीवर ?तुम्हाला ना सोनारांनेच कान टोचायला पाहिजेत हो! आम्ही काही सांगितलं की, वेड्यात काढायचं तुम्ही! आमच्या प्रत्येक सुचनांची कटकट वाटायची तुम्हांला. आता भोगा. 'घर कीं मुर्गी दाल बराबर' अशी तुमची स्थिती झाली आहे. वाईट याचेच वाटते. मग असे कठोर उद्गार निघतात रे तोंडावाटे. उगाच बाऊ प्रत्येक गोष्टीचा आणि हो तो मास्क काय हो बांधता नाकाला? काय हो घरात स्वच्छ धूतलेला रूमाल आहे ना मग बांधा की तो तोंडाला. उगाच फॅशन करता राव तुम्ही!
स्वयंपाक घरात कधी चक्कर मारलीस का रे? आज्जीने बडव्यांतील बरीच औषधे काढून ठेवली आहेत बघ जरा! चक्कर मार, सगळी करोनाची औषधे सापडतील तुला तिच्या बडव्यात. हळद, मध एकत्र करून चिमूटभर तोंडात टाक तुझा खोकला गायब. मस्त एखादी लवंग मटकाव्. भरपूर पाणी शुद्ध पी. पण पेल्यात घेऊन हं! फ्रीजमधील बाटली नको रे तोंडाला लावू. साधे साधे नियम आपली संस्कृती शिकवते. 'काखेला कळसा नि गावाला वळसा' अशी तुझी स्थिती झाली आहे. उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. एकदा आईच्या एखाद्या पदार्थांचे कौतुक कर, बघ रोज स्वच्छ व ताजे, सकस अन्न तुझ्या पोटात जाईल. आज्जीच्या हातचं पिठलं भात खाऊन तर बघा. आजोबांनी आणलेल्या केळावर ताव मार.
एक साध्या साध्या गोष्टी आहेत बघा एकदा करून सहज जमेल हो !सहज करोनावरून विषय निघाला म्हणून सहज मनात आले, आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे अनूकरण करतो बर्गर, पिझ्झावर ताव मारतो अफलातून पण अभिप्राय टाकतो. एकदा देशी पिझ्झाची आॅडर आईला देऊन बघ. तिने केलेला पिझ्झा अव्वल असेल यात शंकाच नाही.पाश्चिमात्य संस्कृतीचे मानगुटीवर चे उतरवा. अरे मी त्याच्या विरुद्ध नाही, मला पण आवडते पाश्चिमात्य संस्कृती. पण किती आधीन जायचं याला बंधन आपण घालायचं. किती अजमावयचं व किती सोडायचे हे शेवटी आपण ठरवायचं. खरंच हे चित्र पाहता त्या काळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
कोणे एके काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. गुण्यागोविंदाने सदस्य राहात होते. आजोबांचा कुटुंब प्रमुख म्हणून आजोबांचा वचक घरावर असायचा. घराघरात स्वच्छतेचा द्योतक असायचा. बाहेरून आल्यावर हातपाय धूवून इतर गोष्टीला हात लावायचा. बाहेरून आल्यावर कपडे बदलायचे. उघड्यावरचे पदार्थ खायचे नाहीत. हे घरातील प्रत्येक सदस्यांच्या मनात बिंबलेले असायचे.
आज हेच सायन्स सांगते आहे पण वेगळया स्वरूपात. आता हे पूर्वजांचे आत्मेच आले आहेत, करोनाच्या रूपात आपल्याला धडा शिकवायला.
कारण आजची पिढी निष्काळजी होऊ लागली आहे. हे दु:ख आता आम्हांला सहन होत नाही, आपलंच सगळे खरे, या जोशात होती लहानगेच मोठ्यांचे गुरू झाले आहेत, आता काय करायचं हा प्रश्न देवताना पडला. म्हणूनच हा निर्णय देवानं आमच्याकडे सोपवला. करोनासारखा राक्षस पृथ्वीवर पाठवला. तुम्हाला धडा शिकवायला.
करोना नाव पण बघ कसे साजेसे आहे. अरे प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात, अति तिथे माती' हा रिवाजच आहे. आता तरी शहाणा हो! अजूनही वेळ गेलेली नाही याच उत्तर तूच शोधायचे. माझे बोलणे कडवट वाटेल तुला व माझे नियम पण जाचक वाटतील.
शेवटी तुलाच ठरवायचं आहे, अरे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!
मला माफ कर पण स्पष्ट शब्दात समज दिली म्हणून रागावू नकोस हं. पण आता तरी सुधरा रे, काळ आला आहे, पण वेळ आली नाही हे पक्क ध्यानात ठेव. मग काय हे पक्का करोना रे!..
तुझ्यात जीव गुंतला"
- ऊज्वला रवींद्र राहणे
No comment