Primary tabs

एसटी केवळ यंत्र नव्हे तर सामान्यांचा आधार

share on:
 
आज महाराष्ट्रात कोठेही काही घडले तरी प्रथम लक्ष्य केली जाते, ती सर्वसामान्यांचा आधार असलेले एसटी राग, संताप, उद्रेक जर सर्वात आधी कोणावर तुटून पडत असेल तर तो एसटीवर आता मला सांगा या सगळ्या आंदोलनाचा निदर्शनाचा काही संबंध या लाल परीशी म्हणा किंवा लाल लाल डब्याशी आहे का ?  ती काय आपली शत्रू आहे का? याच एसटी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी मग तो लहान असो किंवा मोठा गरीब असो वा श्रीमंत स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाशी कसं अगदी जिव्हाळ्याचे नाते तिच्या अंगाखांद्यावरून आपला प्रवास झाला आहे आपल्या सर्वांचे शिक्षण सुरू आहे... भविष्यात करिअर घडेल याच एसटीमुळे आपल्यासारख्या सर्वसामान्यांचे आयुष्य कसे सुखमय झाले आहे. म्हणजेज काय तर याच एसटीचे आपल्या सर्वांबरोबर एक प्रकारचे स्नेहाचे, जिव्हाळ्याचे भावनिक नाते तयार झाले आहे. एसटीला यंत्र न समजता तिला माणुसकीच्या नात्याने जपले पाहिजे, ज्या दिवशी ही भावना लोकांच्या मनामध्ये रुजेल त्या वेळी ही एसटी आनंदाने धावेल.  
 
आपल्यासारखाच सर्वसामान्य
 
आपलाच मित्र
 
संकेत किसन देशपांडे

No comment

Leave a Response