Primary tabs

माँ......

share on:

फुलं कुस्करली तर..

त्यांचा वास मरतो का?

ओंजळीत फुलं खेळवत,

तिनं मला विचारलं.

आणि निरागसपणे

त्या फुलांना कुरवाळलं..

मला आठवली

मागच्या वस्तीतली, करवंदी डोळ्यांची चिंधी

जिला तिच्याच गंधात कुस्करलं गेलं..

मी पटकन लेकीला कुशीत घेतलं

अन् म्हणाले

अगं फुलं कुस्करू नये कोणी

म्हणून तर त्याला काट्यांनी सजवलंय देवबाप्पानं..

 

माँ... तू होशील ना माझं काट्यांच कुंपण..

त्याक्षणी जाणवलं

या फुलाचा हा निरागस गंध..

जपताना...

मला कुंपण झालेच पाहिजे...

 

 -मानसी चिटणीस

No comment

Leave a Response