Primary tabs

नारायणी

share on:

 

मी नभाच्या नीलहृदयी राहते

रंगरेखांनी दिशांना सांधते

कोकिळाला सूर देते मी नवा

चांदणे होऊन रात्री जागते

 

मी उशाला मेघराशी मांडते

मी जळाला बाहुपाशी कोंडते

दान देते मी निशेला चंद्रमा

तारका ओटीत मी सांभाळते

 

शारदा हृदयात माझ्या नांदते

मी शिवाला सुंदराशी जोडते

मीच होते प्रार्थना माझी कधी

मी मला नारायणी संबोधते.

  • सुजाता पवार.

No comment

Leave a Response