Primary tabs

जालन्यात प्रतिभा संगम संपन्न!

share on:

जालन्यात नुकतेच प्रतिभा संगम हे संमेलन पार पडले. त्यात असलेल्या प्रदर्शनात सहभागी झालेल्या दर्शना पाटील  यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात!

प्रदर्शनातून साकारले सजीव देखावे.

अण्णाभाऊ साठे साहित्य नगरी अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित अठरावे प्रतिभासंगम विद्यार्थी संमेलनाच्या विशेष आकर्षण यापैकी एक विशेष आकर्षण म्हणजे तेथील प्रदर्शन ठरले आहे.रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या संचालिका डॉ.स्मिता लेले यांच्या हस्ते दिनांक 1 फेब्रुवारी रोजी उद्घाटन झालेल्या प्रदर्शनाला पहिल्या दिवसातून रसिक साहित्यकांचा प्रतिसाद मिळाला.

 प्रदर्शनी प्रमुख दर्शना पाटील सह प्रमुख प्रितेश सभी, विक्रम राऊत व किरण वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नातून ही प्रदर्शने साकार झाली.या प्रदर्शनास रविवारी दुपारी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर व अन्य मान्यवरांनी भेटी  दिल्या. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा देखावा समर्थ रामदास स्वामी चा जन्म भूमीतील सज्जनगड येथील सजीव देखावा या प्रदर्शनीत सादर करण्यात आल्या.याचबरोबर बळीराजाच्या जीवनाचा परिचय करून देणारा शेतजमिनी मातीवरील आधारित बैलगाडीचा ही देखावा या प्रदर्शनीत साकारला होता त्याच प्रमाणे अशा खंडातील प्रसिद्ध असलेले जालना शहरातील स्टील सिटी याचाही प्रदर्शन करण्यात आलं होतं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित 17 प्रतिभासंगम विद्यार्थी साहित्य संमेलनातील महत्त्वपूर्ण बाबीचा समावेश करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने वर्षभरात आयोजित विविध उपक्रमाचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला होता.

 विद्यार्थी परिषदेच्या प्रतिभासंगम या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनामधे प्रदर्शनी प्रमुख म्हणुन जबाबदारी माझ्याकडे होती. या प्रदर्शनीमधे आम्ही आतापर्यंत झालेल्या  17 प्रतिभासंगम विषयी माहिती लावण्यात आली होती तसेच जालना जिल्ह्यात झालेले कार्यक्रम तसेच गणेश भवन आणि स्टील सिटी चा देखावाही करण्यात आला होता. प्रदर्शनीच्या या नियोजनातून मला खूप काही शिकायला मिळालं.

 

No comment

Leave a Response