Primary tabs

आत्मविश्वास हवाच!

share on:

विक्रम भागवत यांच्या करियर या लेखमालेतला हा पुढचा लेख! 

 

बऱ्याचदा एक उदाहरण आपल्याला दिसते...शाळेत अगदी सामान्य मार्क मिळवणारा अनेकदा त्याने निवडलेल्या क्षेत्रात इतके उज्वल यश संपादन करतो की एक कॉमेंट सर्रास ऐकायला मिळते...”वाटल नव्हत बुवा हा किंवा ही एवढे यश मिळवेल” आणि अगदी ह्या उलट “शाळेत तर किती हुशार होता..आता का असं माकड झाल आहे ह्याचं?” ही कॉमेंट सुद्धा ऐकू येते.

 

सुप्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती म्हणाला होता “I was an average student, but I had capability to employ thousands of brilliant students and create my success”. काय आहे ह्या वाक्यात महत्वाचा संदेश?

 

आत्मविश्वास!

 

आत्मविश्वासाला पर्याय नाही. तुम्ही प्रत्येक यशस्वी व्यक्तीचा अभ्यास करा, तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांच्यात निश्चित आढळेल “आत्मविश्वास”. कुठून येतो हा “आत्मविश्वास”? कसा अंगी बाणवता येतो तो “आत्मविश्वास”?

 

आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे, आपण जे करतो आहोत तेच आपल्याला करायचे आहे? ते करण्यात आपल्याला आनंद मिळतो आहे? जे करतो आहोत त्यावर आपला इतका दृढ विश्वास आहे की लोकांनी कितीही चेष्टा करो, अपयशाची कितीही भीती दाखवो, मी आपल्या मार्गापासून ढळणार नाही, माझ्या मनात शंकाकुशंकांना स्थान नाही, जसा माझ्याजवळ फाजील आत्मविश्वास नाही त्याचप्रमाणे माझी मनोवृत्ती पराभूत नाही....

 

तुम्ही टेनिसच्या स्पर्धा बघता? कित्येक वेळा मॅच पॉईंट पासून एखादा खेळाडू गेम फिरवतो आणि जो गेम तो हरणार हे जवळपास निश्चित असते तो गेम जिंकून जातो. कधी सिंधूला पाहिलं आहे? जिंकण्याची जिद्द, रॉजर फेडररला पाहिलं आहे? बोरिक बेकर, स्टेफी ग्राफ, सचिन तेंडूलकर, सुनील गावस्कर ह्या सर्वांमध्ये “आत्मविश्वास” हाच एक समान धागा तुम्हाला दिसेल.

 

हा आत्मविश्वास स्वतःला शिकवता येतो जसा तो इतरांना आदर्श ठेवून आपल्या अंगी बाणवता येतो.

 

श्रद्धा, स्वतःवर आपण करीत असलेल्या कार्यावर ही खूप महत्वाची असते. विचार करा शस्त्रक्रिया करणारा सर्जन, ज्याच्यावर रोगी आपल्या आयुष्याचे ओझे टाकतो, शस्त्रक्रिया करताना त्याचा हात थरथरु लागला, त्याला घाम फुटला, मी इथे कापू की नकू? अशी संभ्रमावस्था त्याची निर्माण झाली तर काय होईल?

 

लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी वृत्ती आणि कुठे लाथ मारायची ह्याचे सम्यक ज्ञान हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे.

 

ह्या उलट आहे फाजील विश्वास. ह्याबद्दल पुढील वेळी.

No comment

Leave a Response