Primary tabs

खवले मांजर

share on:

खवले मांजर......

बरेचदा वर्तमानपत्रात ऐकतो याच्या बद्दल. याची चोरी करताना लोकांना पकडले वगैरे. पण सदा कुतुहूल असलेल्या या प्राण्याबद्दल चांगली माहिती मात्र मिळत नाही. हा डिस्कव्हरी वगैरे वरून याचे लांबचे भाईबंद -  "आन्ट इटर" माहिती असतात.

पण आपल्या परसातील याच्या बद्दल असतो फक्त ‘माहितीचा अंधार’.

उत्क्रांतीच्या चक्रात जे अनेक प्रकारचे प्राणी तयार झाले त्यातीलच हा एक. माणसाला विचित्र वाटतो पण निसर्गाच्या रचनेत एकदम फिट बसतो. मुंग्या वाळवी खातो , रात्रीच भटकतो. पण अजून बरच काही  करतो....अगदी मनोरंजक!

तर याच्या बद्दलच कुतुहल शमविण्यासाठी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने एक पुस्तक आणले आहे. सागरी कासव संरक्षक म्हणून चिरपरिचित असलेल्या भाऊ काटदऱ्यांनी ते पुस्तक लिहीले आहे आणि प्रसिद्ध चित्रकार आभा भागवतांनी त्याला चित्रांनी सजवलंय.

कासवांच्या संरक्षणाची चांगली सामाजिक व्यवस्था केल्यावर आता सह्याद्री निसर्ग मित्र खवल्या मांजराच्या रक्षणासाठी मैदानात उतरले आहेत.

याच्या प्रिंट मर्यादित उपलब्ध आहेत. पण ई काॅपी नक्कीच सगळ्यांना मिळू शकते. तसेच हे पुस्तक इंग्रजी भाषेतही उपलब्ध आहे. हवी असल्यास आपण त्यांच्या वेबसाईटवरून किंवा मला मेसेज केल्यास मिळू शकते.

www.snmcpn.org

तर हे मांजर आहे की अजून काही हे जाणण्यासाठी ही पुस्तिका जरूर वाचा. हे काम लोकांच्या मदतीने सुरू आहे. आपण ही मदत करण्यास उत्सुक असाल तर वेबसाईट वर माहिती आहेच.

- कपिल सहस्रबुद्धे

9822882011

 

No comment

Leave a Response