Primary tabs

करियर - आपले सामर्थ्य आणि कमकुवत बाजू

share on:

 

 

कसं असतं ना, आपल्याला वाटतं आपण खूप काही करू शकतो, आपल्याला खूप काही आवडतं. पण आवडणे आणि त्यात करियर करणे ह्या गोष्टी भिन्न असतात .ह्या साठी आपल्याला मदत लागते, जी शास्त्रीय असणे खूप आवश्यक असते आणि ह्याला बुद्धिमत्ता चाचणी (Apptitude Test) असे म्हणतात.

 

काय असते ही टेस्ट?

 

टेस्ट म्हटली की लगेच परीक्षा आठवते. परीक्षा म्हणजे चूक किंवा बरोबर हे समीकरण आठवते. पण ह्या टेस्टमध्ये चूक किंवा बरोबर हे निकष नसतात. तर आपली आंतरिक ओळख पटवणे, आपल्याला ओळखणे, काय केले असता आपण ते जास्त चांगले करू शकतो. हे ओळखणे हा ह्या टेस्टचा उद्देश असतो. ह्यासाठी तज्ञांनी तयार केलेले काही प्रश्न असतात आणि त्यांनी उत्तर आपण ठराविक वेळेत द्यायची असतात. बहुतेक प्रश्न ऑब्जेक्टीव्ह असतात.

 

ही उत्तरसुद्धा तज्ञच तपासू शकतात आणि त्या आधारे आपल्या करियरचा मार्ग आपल्याला सांगू शकतात.

 

एक विसरू नका. ते सांगतात तो मार्ग मात्र आपल्यालाच चालावा लागतो. मेहनत करावी लागते. यशाचे अनेक मार्ग असतात. कुठला आपला आहे ह्याची निवड आपल्यालाच करावी लागते आणि त्यासाठी परिश्रम सुद्धा आपल्यालाच करावे लागतात.

 

काही गोष्टींचे स्पष्टीकरण..... सामर्थ्य आणि कमकुवतपणा  (Strengths and Weakness) ह्याचा आपण संक्षिप्त विचार केला. आपली पहिली प्रतिक्रिया असते...माझ्यातील विकनेस घालवण्याचा मी प्रयत्न करेन. आता इथे मी जरा प्रक्षोभक विधान करणार आहे.

 

विशिष्ट वयानंतर आपल्या दोषांवर किंवा विकनेसवर फार काम करू नये. त्यावर जितके आपण श्रम गुंतवतो त्यावर मिळणारे रिटर्न्स त्याप्रमाणात नसतात. त्यापेक्षा आपल्या शक्तीस्थानावर लक्ष केंद्रित केल्यास आणि त्यांना आणखी शक्तीशाली बनवल्यास जास्त फायदा होतो.

 

दुसरी गोष्ट, सध्या स्पर्धायुग आहे. सगळे येऊन जाणू इंजिनियरिंग, मेडिकल, एमबीए, आयटी ह्याचं गुऱ्हाळ लावतात. ह्या पलीकडे कितीतरी पर्याय असतात आणि त्याची माहिती काढणे आवश्यक असते. माहिती हे आजच्या जगातले सर्वात मोट्ठे शस्त्र आणि अस्त्र आहे..

 

पण ह्यासर्वाआधी व्यक्तिमत्व संवर्धन हे आवश्क असते. “आत्मविश्वास” हा आता कळीचा शब्द झाला आहे. तुम्ही खूप हुशार असाल पण तुमच्याकडे आत्मविश्वास नसेल तर, शून्य!

अशी अवस्था आहे.

 

त्याबद्दल पुढील लेखात...

No comment

Leave a Response