Primary tabs

नाते

share on:

हिरव्या रानात रानात

येई आनंद भरात

नभ उतरे खालती

डोंगराला कवळीत  !!१!!

 

दाट झाडीत झाडीत

सूर घुमती पाखरांचे

जुळता निसर्गाशी नाते

भय न उरे श्वापदांचे !!२!!

 

झोत वाऱ्याचा वाऱ्याचा

वाटे सुखद मायेचा

खेळ चाले त्याच्यासवे

लडिवाळ रानफुलांचा !!३!!

 

कशी हिरवाई सुंदर

पाहता दाटले अंतर

रान माझे मी रानाचा

जडले नाते निरंतर  !!४!!

 

सौरभ अनंत देशपांडे , सातारा.

लेखक: 

No comment

Leave a Response