Primary tabs

मौनाचं मृगजळ...

share on:

इतक्या शांतपणे इतक्या कल्लोळात
कित्येक हजार वर्षांपासून उभी आहेस 
कधीच कशी वाटत नाहीस अवघडल्या सारखी.. 

पावलं खूप बोलतात म्हणून
तुझी घडवलीच नाहीत का गं.... 

काही शे वेळेस नव्यानं अडखळायला होतंय तुला बघताना 
तुला घडवताना तुझ्या निर्मात्याला 
किमान काही लाख प्रश्न पडले असतील .. 
पडले होते ना ? 

तुझे डोळे बोलतीलसे वाटे वाटे पर्यंत 
मुके होऊन जातात.. 
आणि ती विवस्त्रतेतली सहजता 
न उमगावी इतकी प्रश्नांकित आहे.. 

ती घट्ट मिटलेली जिवणी जराशी म्हणून सुद्धा 
कशी उकलत नाही.. 

मौनाचं मृगजळ आहेस का गं तू!!

- अभिरुची

yuvavivek@gmail.com

लेखक: 

No comment

Leave a Response