Primary tabs

जोड्या जुळवा

share on:

दोस्तांनो, आपल्याला आयुष्यात अनेक ठिकाणी मुलाखतीला सामोरे जावे लागते. उदा. शाळेत प्रवेश घेताना, उच्च शिक्षण, नोकरी, परदेशात जाताना व्हिसा काढण्यासाठी, इ. 

मुलाखतीदरम्यान मुलाखत घेणाऱ्याचे आणि मुलाखत देणाऱ्याचे वर्तन कसे असावे, कसे असू नये हा आपल्या कोड्याचा विषय आहे. खालील दोन्ही तक्त्यांत मिळून मुलाखतीच्या वेळी काय करावे (Do's) आणि काय करू नये (Dont's) हे सांगितले आहे. अ गटात वर्तनाबद्दल सांगितले आहे, तर ब गटात त्याची कारणे दिली आहेत. अ गटातील (१ ते १०) हे मुद्दे तुम्हाला ब गटातील (अ ते औ) या दिलेल्या कारणांशी जुळवायचे आहेत. बघा तुम्हाला जोड्या जुळवता येतात का? 

योग्य जोड्या जुळवून आपली उत्तरे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपली उत्तरे नोंदवा. 

गट अ

मुलाखतीसाठी जाताना वेळेच्या पुरेसे आधी पोहोचल्याने तिथल्या वातावरणाशी रुळण्यासाठी वेळ लागतो. 
२. उमेदवाराने बायोडेटामध्ये आपली माहिती मुद्देसूद आणि थोडक्यात देणे अपेक्षित आहे. 
३. मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे द्यावीत. 
४. मुलाखत घेणारा हा उत्तम श्रोता असावा. उत्तर देणाऱ्याकडे त्याचे पूर्ण लक्ष असावे. 
५. उमेदवाराचा पोशाख व त्याचे वर्तन औपचारिक आणि मुलाखतीसाठी अनुरूप असावे. 
६. मुलाखतकाराला खूष करण्यासाठी त्याच्या सर्व बोलण्याशी सहमती दर्शवण्याची गरज नाही. 
७. नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीला जाताना केबिनमध्ये शिरण्यापूर्वी, खुर्चीवर बसण्यापूर्वी परवानगी घ्यावी. 
८. मन अस्वस्थ असल्यास बरेच उमेदवार काही निरर्थक प्रतिक्षिप्त हालचाली करत असतात. 
९. मुलाखतकाराने प्रतिष्ठित व्यक्तीची मुलाखत घेण्यापूर्वी त्या व्यक्तीची जास्तीत जास्त माहिती गोळा करून त्याची सत्यता पडताळून त्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. 
१०. मुलाखत घेणारे एकापेक्षा जास्त असतील तर उत्तर देताना प्रश्नकर्त्याकडे पाहून बोलावे.  

 

गट 'ब'

नोकरीसाठी मुलाखत घेणारा उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचे, पोषाखाचे, स्वभावाचे, त्याच्या हालचालीचे निरीक्षण करत असतो. 
केसांवरून हात फिरवणे, नाक खाजवणे, इ. हालचाली सरावाने टाळता येऊ शकतात. 
अनोळखी ठिकाणी सरळ केबिनमध्ये जाऊन खुर्चीवर बसणे सभ्यपणाचे सभ्यपणाचे समजले जात नाही. 
स्वतंत्रपणे विचार करणारी माणसेही लोकांना आवडतात. 
एखाद्या प्रश्नाचे नेमके उत्तर माहित नसल्यास तसे नम्रपणे सांगावे. अंदाजपंचे दिलेले चुकीचे उत्तर पकडले गेल्यास उमेदवाराविषयी मत वाईट होऊ शकते. 
मुलाखतीसाठी उशिरा पोहोचल्यास मन शांत ठेवणे कठीण जाऊ शकते. 
समोरच्या व्यक्तीचे बोलणे चालू असताना फोन घेणे/करणे, मोबाईलवरील मेसेज वाचणे यामुळे बोलणारी व्यक्ती विचलित होऊ शकते. 
मान खाली घालून किंवा आभाळाकडे नजर लावून बोलू नाये. 
बायोडेटा खूप मोठा झाल्यास तो वाचण्यासाठी वरिष्ठांकडे पुरेसा वेळ नसतो. त्यांना एखाद्या मुद्द्याबद्दल माहिती हवी असल्यास ते मुलाखतीच्या वेळेला विचारू शकतीलच.
अपुऱ्या माहितीच्या आधारावर विचारले गेलेले प्रश्न मुलाखत घेणारा व देणारा या दोहोंना अडचणीत आणू शकतात. 

- ज्योत्स्ना सुतवणी

jyotsna.sutavani@gmail.com 

लेखक: 

No comment

Leave a Response