Primary tabs

share on:

‘गूगल मॅप’ हे आजच्या आयुष्यातील केवळ एक महत्त्वाचे ऍप्लिकेशन राहिले नसून, दैनंदिन आवश्यकतेतील एक भाग बनले आहे. खऱ्या अर्थाने जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी याचा उपयोग होत असतो. त्याबद्दल संक्षिप्त माहिती देण्याचा हा एक प्रयत्न...

जग झपाटयाने टेक्नोसॅव्ही बनत चालले आहे. काही ऍप्स तर आपल्या रोजच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनून गेले आहेत. त्यात सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप म्हणजे गूगल. एकूणच सर्व गूगल उत्पादनांनी मिळून जगण्याच्या पध्दतीत मोठा बदल घडविला आहे. दैनंदिन जीवन अधिक सुकर बनविण्यासाठी गूगलसारख्या बलाढय कंपन्या महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.

एखाद्या अनोळखी शहरात गेल्यानंतर तेथील लोकेशन्स शोधण्यासाठी एक दशकापूर्वी जी दमछाक होत असे, ती आज जाणवत नाही. याचे कारण काय असेल? तर ते आहे 'गूगल मॅप'. या एका ऍप्लिकेशनने दैनंदिन जीवनात भासणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यास मदत केली आहे. अगदी ग्रामीण भाग ते शहरी विभाग, ठिकाण कुठलेही असो - गूगल मॅपला ठाऊक नाही, अशी खूप कमी स्थाने या पृथ्वीतलावर उरलेली आहेत.

गूगल मॅप शोध

वेब मॅपिंगसाठी गूगलद्वारे विकसित केले गेलेले हे एक ऍप्लिकेशन आहे. यात सॅटेलाइट इमेजरी म्हणजेच उपग्रहाद्वारे पृथ्वीची जशी आहे तशी प्रतिमा दाखविली जात असते. यात रस्ते, गावे, शहरे, त्याचबरोबर रस्त्यांवरील प्रत्यक्ष वाहतूक, ३६० अंशातील पॅनोरमा व्ह्यू इत्यादी फीचर्स उपलब्ध आहेत.

लार्स रासमॉसेन आणि जेन्स एलिकस्ट्राक रासमॉसेन या दोन सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी गूगल मॅप विकसित केले. २००४ साली हे ऍप्लिकेशन केवळ डेकस्टॉप वापरासाठी बनविले गेले होते. गूगलने ते विकत घेतले आणि नंतर २००५ सालापासून त्यास वेबसाठी विकसित केले गेले. यात प्रत्यक्ष वाहतूक व्यवस्थापनाची आणि पृथक्करणाची जोड देऊन फेब्रुवारी २००५पासून हे सर्वांसाठी खुले केले गेले.

यात ‘बर्ड-आय’ अथवा ‘टॉप-डाउन’ व्ह्यू दिलेला असतो, ज्यात उपग्रहाच्या साहाय्याने एरिअल फोटोग्राफी केलेली असते. जवळपास ८०० ते २००० फुटावरून केलेले हे चित्रीकरण २ वर्षांपेक्षा अधिक जुने नसते. गूगल मॅपमध्ये आज ३-डी व्ह्यूचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष चित्रीकरण असल्यामुळे सॅटेलाइट दर्शनदेखील करता येते.

ऍंड्रॉईड आणि आय-फोनसाठी २००८ साली गूगल मॅप विकसित केले गेले. २०१३पर्यंत हे स्मार्टफोनमधील सर्वाधिक प्रसिध्द ऍप्लिकेशन म्हणून नावारूपाला आले. यात स्मार्टफोनला नॅव्हिगेशन सुविधा दिल्यामुळे सामन्यांसाठी याचा वापर करणे अधिक सुविधाजनक बनले. त्यामुळे अनेक समस्यांवर तोडगा निघाला. आज ओला, उबर, मेरू इत्यादीसारख्या अनेक स्टार्टअप्स केवळ गूगल मॅपच्या जोरावर कोट्यावधीचा व्यापार करू शकत आहेत.

गूगल मॅप हे आजच्या आयुष्यातील केवळ एक महत्त्वाचे ऍप्लिकेशन राहिले नसून, दैनंदिन आवश्यकतेतील एक भाग बनले आहे. खऱ्या अर्थाने जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी याचा उपयोग होत असतो. त्याबद्दल संक्षिप्त माहिती देण्याचा हा एक प्रयत्न होता.

फीचर्स

गूगल मॅपमध्ये अनेक असे फीचर्स आहेत, ज्यामुळे त्याचा प्रभावी वापर करता येणे शक्य आहे. त्याबद्दल जाणून घेऊ या.

आवडीचे/महत्त्वाचे ठिकाण करा सेव्ह * जवळपासची उत्तम रेस्टॉरंट शोधा * तुमच्या घरचा आणि ऑॅफिसचा पत्ता करा स्टोअर. * दोन ठिकाणातील अंतर मिळवा एका क्लिकवर * अचूक रस्ता शोधा * आपले लोकेशन करा शेअरेबल * अनेक ठिकाणच्या लिस्ट करा शेअर * लांब प्रवासात जाताना पिट-स्टॉप (मधली स्थानके) यांची बनवा यादी. * वाहतूक व्यवस्थापन * ऑॅफलाइन मॅप

- हर्षल कंसारा

content@yuvavivek.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response