Primary tabs

देवाक काळजी

share on:

जून २००१ ला M.Sc. संपल. आणि Conservation Biodiversity या नविन कोर्स ला निवड झाल्या email आल. मी अप्लाय केल होत पण असच. अशी निवड वगैरे होईल असस्वप्नात पण नव्हत. पण ती झाली. देवाक काळजी अस गोव्याकडे म्हणतात, तसच असेल काही तरी. सह्याद्री मधे अभ्यास करण्यासाठी एक प्रकल्प रानवा ला मंजूर झाला होता. पण पैसे येई पर्यंत सुरू नको करायला अस रानवातल्या मोठ्यांच म्हणण होत. अनुभवातून आलेल शहाणपण. त्या मुळे वेळ होताच.

बंगलोर मधील प्रतिथयश ATREE संस्थेत दाखल झालो. ८ दिवसाचा कोर्स होता. वेळापत्रक हातात आल आणि विकेटच पडली. गेली २ वर्ष ज्या लोकांबद्दल ऐकल, वाचला, ओझरत पाहीलय तेच शिकवणार होते. प्रा. माधव गाडगीळ, शरदचंद्र लेले, डॉ. अजित कुमार आणि बरेच होते. ८ ते ८ अस भरगच्च शेड्यूल होत. माझ्यासाठी तेच थोड अवघड होत. पण समोर एवढा मोठी माणसे. कसा बसलो माहीती नाही पण बसलो. आणि तो दिवस ऊजाडला जे वाचून अप्लाय केल होत. पुढचे ४ दिवस field work. बिलीगिरी रंगन टेंपल अभयारण्या मधे. त्यासाठी केला होता अट्टहास म्हणतात ना तस!

आम्ही म्हैसूर मार्गे कावेरी च्या watershed मधून अभयारण्यात पोहोचलो. महाराष्ट्रात फिरताना जंगलातच मुक्काम करण्याची सवय होती. पण तिथे ATREE च छानस campus होत. दुसऱ्या दिवशी गणेशन या शास्त्रज्ञाने सगळी सेंच्युरी दाखवली. त्यानी मार्ग असा निवडला की गवताळ कुरणा पासुन शोला फोरेस्ट पर्यंत सगळ दाखवलं अगदी शांतपणे. मी पहील्यांदाच या भागात आले होतो. महाराष्ट्राबाहेर दुसऱ्यांदा. आत्तापर्यंत काळवीट हा सर्वात मोठा प्राणी पाहीला होता तोही रेल्वे मधून. पण इथे एका दिवसात गवे, हत्ती, सांबर सगळे भरभरून होते. एका दरीत गव्यांच्या एका कळपात गाडी अडकली. २०-२५ गवे होते. फुत्कारत होते. आणि एकाने चार्ज केलाच. पण ड्रायव्हर सवयीचा होता. त्याने वेळीच पण हसत हसत गाडी काढली. Field work नंतर रात्री अनुभव सांगण्याची व पुढच्या कामाची तयारी हे काम होते. आमच्या जोड्या बनविल्या. माझ्या बरोबर रणथंबोर मधे काम करणारी मेंदीरत्ता नावाची मुलगी होती. हरणांची संख्या त्यांच्या विष्ठेचा अभ्यास करून कशी मोजायची असा अभ्यास होता. हे सगळच नविन होत. दुसऱ्या दिवशी आम्ही व एक वाटाड्या असेच असणार होतो. पुढचे तीन दिवस मला जंगल काय असत याचा पुरेपुर अनुभव येणार होता, पण मी माझ्या धुंदीत होतो.

दुसऱ्या दिवशी एका उंच प्लाटू वर गाडीने आम्हाला सोडल. सकाळचे दोन तास नीट गेले. आणि तो वाटाड्या ओरडत आला पळा पळा. काय झाल. तर दूर एक हत्ती येत होता. त्याचे सुळे इथूनच मोठे दिसत होते. आम्ही विचार कशाला पळतो, इकडे थोडाच येणार. पण वाटाड्या ऐकेचना. तो म्हणाला शेवटचे सांगतो, या नाही तर मरा. मग आम्ही एका शिळे मागे लपलो. गजराज चित्कारत येत होता. वारा आमच्या कडून गजराजाकडे होता. त्याला वास लागला होता माणसांचा. १५-२० मिनीटात तो बरोबर आम्ही काम करत होतो तिथेच आला. आमच्या पासुन थोड्याच अंतरावर होता. वारा थांबला होता. त्या मुळे त्याला आमचा अंदाज येत नसेल. पण आम्ही एकदम बघु शकत होतो. केवढा होता तो. नजरेत पण मावत नव्हता. त्यांच्या चित्कारांनी तर पार फाटलीच होती. वाटाड्या जास्त घाबरला होता. कदाचित त्याला परिणामांची जाणिव असावा. आम्ही जिथे काम करत होतो तो परिसर यथेच्च तुडवून तो गजराज मार्गस्थ झाला. साधारण तासभर हे नाट्य चाललंं. मग काम सुरू करू तर वाटाड्या तयार होईना. तो म्हणाला हत्ती परत येईल आपण जाऊया. मगाच्या त्याच्या अचूक अंदाज मुळे आम्ही फार विरोध केला नाही. एका पाऊलवाटेने तास दिड तास चालून आम्ही campus ला आलो.

बिलीगिरीरंगन च्या अभयारण्यातला तिसरा दिवस होता. कालच्या गजराजामुळे एक भिती मनात होतीच. पण जंगलात फिरायच वेड लागल की ही भिती क्षणिक ठरते असा अनुभव कायम येतो. आज आम्हाला एका छोट्या दरीत काम करायच होत. म्हणजे हरणासारख्या प्राण्यांच्या विष्ठेवरून त्यांची संख्या मोजण्यासाठी माहीती गोळा करायची होती. आम्ही ८ वाचताच पोचलो. बरोबर नविन expert वाटाड्या होता. गाडीतून गवे, चितळ, सांबर वगैरे बरेच प्राणी दिसले. काही अलार्म कॉल पण आले. स्थानिकexpert च मत होत की जवळ बिबट्या असावा. पण दिसला नाही. त्या दरीत काम सुरू केल. दरी फार मोठी नव्हती. दोन्ही बाजूला छोटे डोंगर आणि मधून वहाणारा ओढा. त्याच्या एका अंगाला कदाचीत डाव्या,आम्ही काम करत होतो. १०-११ पर्यंत मस्त काम झाल. आणि त्या expert नी शांत रहाण्याची खूण केली. दिसत तर काहीच नव्हत पण कालच्या अनुभवातून आम्ही थोड शिकल होतो. सगळी कडे शांतता होती. पान पण हलत नव्हती. काय चाललय काही कळत नव्हत. १०-१५ मिनीटांनी तो म्हणाला वरच्या बाजूला हत्तींचा कळप आहे. तुम्ही चालू ठेवा मी बघतो. मग आम्ही नीट बघितलंं  तर ३-४ हत्ती होते. एवढा अवाढव्य देह पण त्या रानात कळत नव्हता. अर्धा पाऊण तास गेला. तेवढ्यात तो आला. म्हणाला आपल्याला जायला हवय. सगळ्या बाजूने हत्तीनी वेढलो गेलोय. नीट पहा. आता मात्र टरकायला झाल होत. आम्ही एका दगडा आड लपून पाहू लागलो. दरीच्या दोन्ही बाजूला हत्ती होते. एकूण २०-२५ होते. हत्तीणी आणि मुख्य म्हणजे त्यांची मुल होती. बहूदा त्या आमचा अंदाज घेत असाव्यात. टीव्हीत बघतो तस सोंड वर खाली करण सुरू होत. त्या दरी कडे सरकतील अस वाटत होत. तो म्हणाला एकदम शांत वाकून जायच. मी सांगितल की चालायच. घाबरायच नाही. पर्याय नव्हताच. पण घाबरायच नाही. आम्ही रस्त्या पासून साधारण १ किमी असू. हे अंतर पार करायला साधारण ३ तास लागले. थोड पुढ जायच. मग शांत व्हायच त्यानी अंदाज घ्यायचा. आम्ही पण बघत होतो. हत्तीणी पण अंदाज घेत होत्या. ३ च्या आसपास आम्ही रस्त्यावर आलो. म्हणजे जंगलातल्या सडकेवर. मुक्काम खुप दूर होता. पण तो एकदम बिनधास्त झाला. त्यामुळे आम्हालाही हुशारी आली. मग तो हत्तींचे किस्से सांगू लागला. एक एक ऐकताना आपण काल व आज कशातून वाचलो याची कल्पना करत होतो. पण मग काही झाल नाही. मुक्कामी आलो. चौथ्या दिवशी कालच्या जागेच्या बरोबर विरूद्ध बाजूला जायच होत. 
दिवस उजाडलाच तो कंटाळवाणा होता. मळभ होत. एक प्रकारची उदासी होती. पण जंगलात आत पोचे पर्यंत मस्त ऊन पडलंं. एकदम साफ. पुस्तकात लिहीलेलंं  असत ना मळभ दूर झालय तस. स्वच्छ. ते दृष्य आत्ता पण आठवतय मला. ते कोवळ ऊन. खूप सुंदर. आम्ही कामाला सुरूवात केली. बरच काम झाल. २-३ वाजे पर्यंत. कंटाळापण यायला लागला. तेवढ्यात एक अस्वलीण दिसली. दूर होती. पण आमच्या बाजूलाच येत होती. एकाएकी दिसेनाशी झाली. १-२ मिनीट गेली असतील तर परत दिसली. मात्र ती पळत येत होती. आमच्याच दिशेला. एकदम समोर. ती आमच्याकडेच येतीय अस वाटत होत. पण अंदाज येत नव्हता. एक ५० मी वर आली असेल तेवढ्यात तिने मार्ग बदलला. दिसेनाशी झाली. आम्ही सुटकेचा निश्वास टाकणार, तितक्यात आमच्या डोक्यावरील झाडवरून बिबट्याने ऊडी मारली. एकदम आमच्या समोर आणि काही कळायच्या आत तो दिसेनासा झाला. पुढचा अर्धा पाऊण तास काय झाल आठवत नाही. पण आम्ही बसुन राहीलो असणार सुन्न पणे. थोड्यावेळाने काम सुरू केल. जंगल त्याच्याच मस्तीत होत जणू काही झालच नाही. खर आहे काही घडल नव्हतच. आम्ही परत रस्त्यावर आलो. तेवढ्यात त्या expert नी कुठून एक पोळ तोडून आणल. तिघांनी मस्त ताव मारला त्याच्यावर.
या नंतर मी जंगलात खूपदा गेलो, राहीलो पण त्या तीन दिवसात वन्य प्राण्यांचे जे अनुभव आले ते आले नाहीत. बिलीगीरीरंगनच ते जंगल या साठी कायम स्मरणात राहील.

कपिल सहस्त्रबुद्धे 

लेखक: 

No comment

Leave a Response