Jyoti

share

अनघानं भाजी, आमटी आणि कोशिंबिरीवर कोथिंबीर भुरभूरवली, फ्रीजमध्ये ठेवलेलं कस्टर्ड सेट होत आलंय का ते बघितलं आणि एकदा ओट्यावरून हात फिरवून घेतला. आज तिने मोठाच घाट घातला होता, कारणही तसंच होतं. काल समीरची, तिच्या नवऱ्याची बोर्ड मीटिंग संपली होती. काल ऑफिसच्या लोकांबरोबर जेवण ठरलं होतं,पण आज संध्याकाळी मुद्दामच अनघाने हा स्पेशल बेतफक्त त्या दोघांसाठीच ठरवला होता. गेले जवळजवळ दोन महिने प्रचंड तणावात गेले होते. समीरवर खूप मोठी जबाबदारी होती. त्याला दिवसभर ऑफिसमधून अनघाला मेसेज करायला तर, वेळ होत नव्हताच पण घरी आल्यावरसुद्धा नीट बोलणं होत नव्हतं.

Pages