Primary tabs

तुला शतदा वंदिता

share on:

स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त म्हणजेच १२ जानेवारी रोजी भारतात १९८४ पासून 'राष्ट्रीय युवा दिन' साजरा केला जातो. युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामीजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी केलेल्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी आर्या जोशी यांची ही खास कविता 'युवाविवेक'च्या वाचकांसाठी...

 

एक संन्यासी योद्धा

युवकजनांचा नेता

शास्ता आणि धर्ता

विश्वबंधुत्वाचा पुरस्कर्ता

शिष्योत्तम म्हणून प्रतिष्ठा

तत्त्वज्ञानाचा अभ्यासकर्ता

संगीतातही विद्वत्ता

पाककलेत निपुणता

स्वकुटुंबाप्रती आस्था

जगाप्रती काकुळता

तुला शतदा वंदिता

मनी दाटते कृतज्ञता

 

- आर्या जोशी

content@yuvavivek.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response