Primary tabs

टीम इंडियाने ७१ वर्षांनी घडवला इतिहास

share on:

 

७ जानेवारीला भारतीय टीमने ऑस्ट्रेलियन टीमला त्यांच्याच भूमीत हरवून तब्बल ७१ वर्षांनी नवा इतिहास रचला. भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत राहिला. त्यामुळे ४ सामन्यांची कसोटी मालिका भारताने २-१ अशी जिंकून ७१ वर्षांनी ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास घडवला. या मालिका विजयामुळे भारत हा ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई क्रिकेट संघ ठरला आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही किमया करून दाखवली आहे. भारतीय संघाने ॲडलेड व मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. त्यामुळे सिडनी कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला बरोबरी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे पक्क होत. भारताने पहिल्या डावातच ६२२ धावांचा मोठा डोंगर उभा केल्याने कांगारूंना हरवणे सोपे झाले. १९३ धावा करून या कसोटी मालिकेचा खरा हिरो ठरला तो चेतेश्वर पुजारा. यावेळी भारतीय संघाने त्यांना कोणतीच संधी न देता विजय खेचून आणला. १९४७ साली भारत ऑस्ट्रेलियामध्ये पहिली कसोटी मालिका खेळला होता. तेव्हापासून झालेल्या ११ मालिकांमध्ये भारताला विजय मिळवता आला नव्हता. मात्र ७२ वर्षांनी भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकता आली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी दरम्यान भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याने महत्त्वाचे दोन विक्रम त्याच्या नावे केले. एक म्हणजे पंतने त्याच्या कारकिर्दीतील दुसरे शतक केले. जे आतापर्यंत कोणत्याच भारतीय यष्टीरक्षकाला जमले नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मध्ये शतक ठोकणारा पंत हा पहिला भारतीय तर जगातला दुसरा यष्टीरक्षक बनला आहे. त्याच्या आधी जेफ्री डू जॉन यांनी हा विक्रम केला होता. तसेच ऋषभ पंत हा एकाच कसोटीत २०० पेक्षा जास्त धावा आणि २० पेक्षा अधिक झेल घेणारा आशिया खंडातील पहिला यष्टीरक्षक बनला आहे. त्यामुळे मोईन खान,  मुश्फिकुर रहीम आणि ऋषभ पंत या तिघांनीही आशिया बाहेर दोन शतके करण्याचा विक्रम केला आहे. पंतने केलेला आणखी एक विक्रम असा की, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक ठोकणारा तो दुसरा सर्वात तरुण क्रिकेटर ठरला आहे. तो २१ वर्षाचा असून, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने वयाच्या १८व्या वर्षी दोन शतके केली होती. 

- ज्योती बागल

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response