Primary tabs

साहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन

share on:

यवतमाळ : ९२ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी पार पडले. संमेलनाच्या उद्घाटिका वैशाली येडेमावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, संमेलन अध्यक्षा अरुणा ढेरे, कांचन चौधरीमहामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. ग्रंथ प्रदर्शन पार पडल्यानंतर आता वाचकांनी पुस्त दालनांत मोठी गर्दी होत आहे. संमेलनाच्या उद्घाटनाकडे साहित्यिकांचे लक्ष लागले आहे.

यवतमाळमध्ये होत असलेले ९२ वे साहित्य संमेलन वादग्रस्त ठरले होते. मात्र, शुक्रवारी नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी ग्रंथ दिंडी निघाली आणि वाजत गाजत संमेलन स्थळी पोहोचली. साहित्य रसिकांचा उत्साह यावेळी ओसंडून वाहत होत. त्यानंतर ध्वजारोहण होऊन ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनही पार पडले. दुपारी ४ वाजता मुख्य संमेलनाच्या उद्घाटन होणार आहे, संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी वैशाली येडे या करणार असून मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख संमेलनाची सूत्रे डॉ. अरुणा ढेरे यांच्याकडे देणार आहेत.

वैशाली येडे यांनी भाषण करण्याचे ठरवले आहे, त्यानुसार शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, आत्महत्येनंतर त्यांच्या मागे असलेल्या मुलाबाळांची, पत्नी आणि कुटुंबियांची अवस्था वाईट होते आदी सांगण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न आणि व्यथा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मांडण्यास मदत होईल, असे विश्वास आयोजकांना आहे. या कार्यक्रमाला मराठी भाषा व सांस्कृतीक कार्य मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्याही भाषणाची उत्सुकता साऱ्यांना आहे.

यवतमाळ, ९२ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनतील ठळक घडामोडी

· डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सर्व साहित्यिकांनी अभिवादन

· सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक प्रदर्शानेचेही उद्घाटन पार पडले.

· पुस्तक प्रदर्शनात देशातील अनेक प्रकाशनांचे पुस्तके मांडण्यात आलेत.

· यवतमाळच्या नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

· साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीचा समारोप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरीत

· उद्घाटिका वैशाली येडे, संमेलना अध्यक्षा अरुणा ढेरे, कांचन चौधरी, महामंडळाच्या अध्यक्षा विद्या देवधर व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

सौजन्य- महा एमटीबी

 

लेखक: 

No comment

Leave a Response