Primary tabs

राज कपूर ते शो मॅन

share on:

वयाच्या ११व्या वर्षी ‘इन्कलाब’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करून नंतर 'शो मॅन’ची ख्याती मिळवणारे राज कपूर यांचा आज जन्मदिन...

राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी पेशावर येथे झाला. त्यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब पंजाबमध्ये स्थायिक झाले. राज यांचे शिक्षण देहरादून येथील शाळेत झाले. शिक्षणाची आवड नसलेल्या राज यांनी दहावीतूनच शाळा सोडून दिली. राज यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्याकडून मिळाला. ‘बॉम्बे टॉकीज’च्या स्टुडीओतून त्यांनी सहाय्यक म्हणून कामाला सुरुवात केली.

नायक म्हणून राज कपूर यांची फिल्मी सफर सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्यासोबत ‘नीलकमल’ या सिनेमाने सुरु झाला. १९५१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आवारा’ चित्रपट राज कपूर यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. आवारा चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय अभिनेत्याचा मान मिळाला. राज कपूर यांनी वयाच्या २४ व्या वर्षी ‘आर के स्टुडीओ’ या नावाने स्वतःचे प्रॉडक्शन हाउस सुरु केले. त्यामुळे ते चित्रपट सृष्टीतील सर्वात तरुण दिग्दर्शक बनले.

राज कपूर यांचे अनेक सिनेमे गाजले. त्यातील ‘मेरा जुता हैं जपानी’, ‘आवरा हूँ’, ‘ए भाई जरा देखके चलो’, ‘प्यार हुआ’ ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.

राज कपूर यांना पांढरी साडी विशेष आवडायची. त्यामुळे त्यांच्या चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रींना म्हणजेच नर्गिस, वैजयंतीमाला, पद्मिनी, जीनत अमान, मंदाकिनी यांना त्यांनी पांढरी साडी नेसायला लावली. राज कपूर यांना आवडत असे म्हणून त्यांच्या पत्नी कृष्णा देखील पांढरी साडी नेसत असत.

आपल्या अभिनय, दिग्दर्शन कौशल्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या राज कपूर यांचा १९७१ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला गेला. त्यांना ‘अनाडी’ आणि ‘जिस देश में गंगा बहती हैं’ या चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. तर, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’ आणि ‘प्रेम रोग’ या चित्रपटांसाठी 'उत्कृष्ठ चित्रपट' म्हणून पुरस्कृत करण्यात आले होते.    

‘छोट्या कामापासून सुरुवात करूनच मोठे होता येते’ हा राज कपूर यांना त्यांच्या वडिलांनी दिलेला सल्ला होता, जो त्यांनी आयुष्यभर पाळला. २ जून १९८८ रोजी राज कपूर यांनी जगाचा निरोप घेतला, खरा पण आजही ते आपल्या चाहत्यांच्या मनात घर करून आहेत.

- युवाविवेक

content@yuvavivek.com

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response