Primary tabs

पुलवामानंतर काय?

share on:

गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019ला जम्मूहून श्रीनगरकडे राष्ट्रीय महामार्ग 1एवरून जात असलेल्या सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या (सीआरपीएफच्या) वाहन ताफ्यातील बसवर काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपूर गावाच्या एका टी-जंक्शनवर एका आत्मघातकी काश्मिरी दहशतवाद्याने अंदाजे 300-250 किलोग्रॅम स्फोटके भरलेल्या मारुती इकोस्पोर्ट गाडीने धडक मारली. वाहन ताफ्यात 67वर गाडया आणि अंदाजे 2500वर सेंट्रल रिझर्व्ह पोलीसचे सैनिक होते. या धडकीमुळे झालेल्या भीषण स्फोटात दोन बसेसचा संपूर्ण चुराडा झाला, 45 सैनिक शहीद झाले आणि 50 पेक्षा जास्त जखमी झाले.

सर्व परिसर लोखंड/टिनाच्या व मृतदेहांच्या तुकडयांनी आणि सैनिकांच्या रक्ताने माखून गेला. ज्या ठिकाणी स्फोट झाला, ते ठिकाण श्रीनगरपासून केवळ 25 किलोमीटर्स दूरवर आहे. हा आत्मघातकी जिहादी हल्ला करणारा आदिल अहमद दर उर्फ वकास कमांडो हा वीस वर्षीय तरुण, दक्षिण काश्मिरमधील पुलवामाचा रहिवासी होता. आदिल अहमदने सीआरपीएफ कॉन्व्हॉयचा काही वेळ पाठलाग केल्यानंतर (ट्रेल/फॉलो द कॉन्व्हॉय) कॉन्व्हॉयच्या मध्यात असलेल्या बसवर आपल्या गाडीने धडक दिल्यामुळे प्रचंड नुकसान झाले. जिहाद्यांच्या सामरिक दृष्टीकोनातून हा पर्याय सर्वात उत्तम होता. दुर्घटना झाल्यावर केवळ एका तासात पाकिस्तानस्थित जैश ए महंमद (महम्मदची सेना) या जहाल दहशतवादी संघटनेने या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून अनेक सैनिक मारले गेल्याचा आणि मोठया प्रमाणात बसेस नष्ट झाल्याचा दावा केला. 1980पासून आजतागायत काश्मीरमध्ये अंदाजे 70 हजार लोक जिहादी हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत.

दहशतवादी संघटना

जैश ए महम्मद ही दहशतवादी जिहादी संघटना महंमद मसूद अझर अल्वीने 2000मध्ये उभी केली. या संघटनेबरोबरच हरकत उल मुजाहिदीन/हरकत उल अन्सार या संघटनेचाही प्रमुख असलेल्या महंमद मसूद अझरला  अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने 2010मध्ये 'आंतरराष्ट्रीय दहशतवादी' घोषित केले असले, तरी संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या 1267 रूलिंग अंतर्गत संयुक्त राष्ट्रसंघानेही त्याला तोच दर्जा द्यावा, ही भारतीय विनंती चीनने आपला व्हेटो वापरून प्रत्येक वेळी धुडकावून लावली. मागील दोन वर्षांमध्ये महंमद मसूद अझरचा  भाचा, स्नायपर ऍटॅक तज्ज्ञ मुहम्मद उस्मान आणि जैशचा ऑॅपरेशनल चीफ खालीद आपल्या 150वर सहकाऱ्यांसह सेनेच्या कारवाईत 'अल्लाप्यारे' झाल्यामुळे, जैशने एवढा मोठा हल्ला करावा याचे संरक्षणतज्ज्ञांना आश्चर्य वाटत आहे. जैशचे जिहादी काश्मिरी लोकांमध्ये सहज एकरूप होऊ शकले/होत असले (सक्सेसफुल मिक्सिंग विथ लोकल पीपल), तरी त्यांची संख्या आता फार मोठी राहिली नाही. याच संघटनेने तेहरिक ए तालिबान, पाकिस्तानसाठी, पाकिस्तानला प्रचंड जीवितहानी व वित्तहानी पोहोचवणाऱ्या अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये भाग घेतला असला, तरी आयएसआय आणि पाकिस्तानी सेना त्यांना काश्मीरवरील हल्ल्यांसाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करू देते. काश्मीरवरील अशा हल्ल्यांना पाकिस्तानी एस्टॅब्लिशमेंट 'लोकस्वातंत्र्याचा लढा' म्हणत संपूर्ण सहकार्य करते. जरी बहुसंख्य पाकिस्तानी लोकांना त्यांच्या सरकारने पाकिस्तानवर लादलेला दहशतवाद पसंत/मान्य नसला, तरी भारताने जिहाद्यांचा नायनाट करण्यासाठी, पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याला ते लोक जिहाद्यांवरचा नाही, तर पाकिस्तानी जनतेवरचा हल्ला मानतील याची कल्पना असल्यामुळे भारत हे पाऊल उचलत नाही. अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश स्वतः दहशतवादी हल्ल्यांनी ग्रासले गेले असले, तरी ते काश्मीरवरील हल्ल्यांचा निषेध न करता भारताला केवळ दांभिक सहानुभूती दाखवत असल्यामुळे पाकिस्तान सरकारला व जिहाद्यांना 'आम्ही काश्मिरमध्ये काहीही केले तरी कोणी आमचे काहीही बिघडवू शकत नाही' असा विश्वास वाटतो, अशी खात्री आहे.

वापरण्यात आलेली स्फोटके भारतात कुठून आली? कुठल्या प्रकारच्या स्फोटकांचा वापर करण्यात आला? यात इंटेलिजन्स/ऑॅपरेशनल फेल्युअरचा किती वाटा होता? याची चाचपणी करून पडताळा घेण्यासाठी नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग टीम पुलवामात गेली असताना पोलीस व सुरक्षा दलांनी आणि सरकारने याविरुध्द काय, कशी व केव्हा ऍक्शन घ्यायची आणि भविष्यात असे होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायच्या, याचा युध्दाभ्यास (वॉर गेमिंग) सुरू केला. यावरील उपाय/पर्याय जटिल व किचकट असतील, मात्र त्यावर राजकीय दबावामुळे 'अर्ली, स्पेक्टॅक्युलर नी जर्क रिऍक्शन' न देता/करता, साधकबाधक विचार करून, थंड डोक्याने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अर्थात मोदी सरकार या दहशतवादी कारवाईमुळे घाबरून जाणार नाही आणि जनतेच्या भावना आणि धैर्य यामुळे आपण लवकरच या धक्क्यातून बाहेर पडू, यात शंकाच नाही.

 युध्दाभ्यास

हल्ल्याच्या ठिकाणी वापरण्यात आलेली स्फोटके भारतात कुठून आली? कुठल्या प्रकारच्या स्फोटकांचा वापर करण्यात आला? यात इंटेलिजन्स/ऑॅपरेशनल फेल्युअरचा किती वाटा होता? याची चाचपणी करून पडताळा घेण्यासाठी नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग टीम पुलवामात गेली असताना पोलीस व सुरक्षा दलांनी आणि सरकारने याविरुध्द काय, कशी व केव्हा ऍक्शन घ्यायची आणि भविष्यात असे होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायच्या, याचा युध्दाभ्यास (वॉर गेमिंग) सुरू केला. यावरील उपाय/पर्याय जटिल व किचकट असतील, मात्र त्यावर राजकीय दबावामुळे 'अर्ली, स्पेक्टॅक्युलर नी जर्क रिऍक्शन' न देता/करता, साधकबाधक विचार करून, थंड डोक्याने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अर्थात मोदी सरकार या दहशतवादी कारवाईमुळे घाबरून जाणार नाही आणि जनतेच्या भावना आणि धैर्य यामुळे आपण लवकरच या धक्क्यातून बाहेर पडू, यात शंकाच नाही. मागील दोन दशकांपासून सीमेपारच्या लष्करी कारवाई करण्याच्या मनसुब्यांवर पाकिस्तानी आण्विक अस्त्राचे सावट पडलेले आढळून येते. मात्र 2016च्या 'सर्जिकल स्ट्राइक'मुळे या भ्रमाचा भोपळा फुटला. त्या कारवाईच्या वेळीदेखील चीन पाकिस्तानच्या प्रत्यक्ष मदतीला आला नव्हता आणि आता तर मुळीच येणार नाही, कारण आधीच चीन व पाकिस्तान दोघांमध्ये सीपीईसीवरून बेबनाव/कुरकुर सुरू झाली आहे. त्यामुळे चीनशी असलेल्या व्यापारी करारांच्या आडोशाने भारताने राजकीय मुत्सद्देगिरीचा जबरदस्त धक्का दिल्यास, सर्जिकल स्ट्राइकने जे यश मिळाले,त्यापेक्षा कितीतरी जास्त यश भारताला मिळू शकते. उरी, पठाणकोट, पुलवामा यासारखे 'रिऍक्टिव्ह' न राहता आता 'प्रोऍक्टिव्ह' कारवाया करण्याची गरज आहे.

दूरचित्रवाहिन्यांनी या घटनेत कोणाचा दोष आहे याचा मागोवा घेणे सुरू केले. हे इंटेलिजन्स फेल्युअर आहे का? जर 'रियल टाइमली इंटेलिजन्स' मिळाले असते, तर हा आत्मघातकी हल्ला सफल झाला असता का? असे प्रश्न टीव्ही ऍंकर्सनी विचारलेत. जरी रियल टाइमली इंटेलिजन्स मिळाले, तरी जमिनीवरील वेगळया परिस्थितीमुळे ('व्हेरिएबल फॅक्टर्स ऑॅन ग्राउंड'मुळे) दहशतवादी हल्ला सफल होऊ शकतो, हे यांना पटतच नाही.ज्या वेळी जिहादी आपले टार्गेट निवडतो, त्या वेळी जागा, वेळ, धोरण आणि कार्यवाही काय, कशी, केव्हा, कुठे, किती तीव्रतेने करायची हे आक्रमणकर्ता जिहादी ठरवत असल्यामुळे जोपर्यंत हल्ला सुरू होत नाही, तोपर्यंत सेना/सुरक्षा दल काहीच करू शकत नाही आणि म्हणूनच त्यांना जीवितहानी सहन करावी लागते/झेलावी लागते. आत्मघातकी हल्लेखोराला तर आपल्या जिवाचीदेखील पर्वा नसते आणि म्हणूनच त्याला लाभलेल्या 'सरप्राइझ ऍंड इनिशिएटिव्ह'मध्ये प्रचंड वृध्दी होते. जिहाद्यांचे पाकिस्तानस्थित हँडलर्स आत्मघातकी किंवा सध्या जिहादी हल्ल्याची सफलता त्यात किती जीवितहानी व वित्तहानी झाली, यावरून ठरवतात.ज्या दहशतवाद्यांची मारक क्षमता कमी (इन्फिरियर स्ट्रायकिंग पॉवर) असते, ते बहुतांश वेळा सेना/सुरक्षा दलांशी थेट लढा देण्याचे धाडस करत नाहीत. त्यामुळे, तीव्र हल्ला करून तडक छूमंतर व्हायचे धोरण ते नेहमीच अंगीकारतात. छोटेछोटे हल्ले करून सेना/सुरक्षा दलांना दहशतवादी भोवऱ्यात अडकवून ठेवायचे आणि त्यांचे सामरिक खच्चीकरण करायचे काम ते करतात. भारतातील प्रत्येक नागरिकाला हे कळते/माहीत आहे की अशा दहशतवादी हल्ल्यांची आखणी (प्लॅनिंग), प्रशिक्षण (ट्रेनिंग) आणि कारवाईची (एक्झिक्यूशन) सर्व रचना पाकिस्तानमध्ये केली जाते. पुलवामामधील हल्ल्यातही महंमद मसूद अझरचे संपूर्ण योगदान असल्यामुळे त्याच्यावर ऍक्शन घेणे आवश्यक आहे. प्रत्येक हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केवळ दोषारोपण करण्याऐवजी आणि यावर कडक कारवाई केली जाईल अशी फक्त धमकी देण्याऐवजी काही ठोस कारवाई होणे/करणे अपेक्षित आहे.

अनेक देशांकडून निषेध

पुलवामा हल्ल्याची बातमी कळताच अमेरिका, रशिया, इस्रायल, फ्रान्स, ब्रिटन यांनी आणि दक्षिण आशियातील सर्व देशांनी त्याची निरर््भत्सना केली. जरी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानने लगेच 'भारत आता याबद्दल पाकिस्तानलाच दोष देईल आणि आमच्यावर कारवाई करेल' असा कांगावा केला असला, तरी पाकिस्तान व चीन आणि पाकिस्तानला मोठी आर्थिक मदत करणाऱ्या सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांनी या हल्ल्याचा निषेध करायला छत्तीस तासांहून अधिक वेळ घेतला. सौदी अरेबियाच्या  सलमान राजाने 19 फेब्रुवारी 2019च्या आपल्या भारतभेटीदरम्यान या हल्ल्याच्या निषेधार्थ एक वाक्यही उच्चारले नाही. भारतानी पाकिस्तानशी वार्तालापाचा पर्याय अंगीकारावा, असा कल्लोळ करणाऱ्या काश्मिरी नेत्यांनी तर याच्या निषेधासाठी चाळीस तासांवर वेळ घेतला. नंतर झालेला निषेधदेखील केवळ नावापुरताच होता, कारण त्यांनी पाकिस्तान लष्कर, आयएसआय, मसूद अझर महंमदला पाठिंबा/वैधानिक शरण देणारा चीन किंवा खुद्द पाकिस्तानचे नाव घेऊन निषेध केला नाही. यावरून काश्मीरमध्ये जिहादी दहशतवाद फैलावण्यासाठी झालेल्या, काश्मिरी नेते, पाकिस्तान, चीन व जिहाद्यांच्या अंतर्गत हातमिळवणीचा उलगडा होतो. अफगाणिस्तानमध्ये रशिया व अमेरिकेविरुध्द जिहाद्यांचा वरचश्मा झाल्यामुळे स्फुरण पावलेली आणि अफगाण तालिबान्यांना समेटासाठी राजी करायला पाकिस्तानची मदत मागणाऱ्या अमेरिकेमुळे 'अपनी गुड्डी उपर झालेली' पाकिस्तानी सेना, आयएसआय आणि सरकार, काश्मीरमधील जिहादी दहशतवादाच्या कार्यक्रमाला खीळ घालणार नाही.

पाकिस्तानचा जिहादी दहशतवाद, आत्मघातकी हल्ले आणि कॉर्डन ऍंड सर्च व एन्काउंटरदरम्यान पैसे घेऊन दगडफेक करणाऱ्या काश्मिरी तरुणांविरुध्द आता कोणाचा कोणताही मुलाहिजा न ठेवता खंबीर कारवाई सुरू करण्याची वेळ आली आहे. काश्मीर खोऱ्यातील संदिग्ध जिहादी, दहशतवादी, जिहादी समर्थक लोक/जनता, स्लीपर सेल्स आणि प्रसिध्द/अप्रसिध्द फुटीरतावादी राजकारणी या सर्वांची वेसण आवळण्याची घटिका आता आली आहे. त्यासाठी खोऱ्याला 'सॅनिटाइज' करणे आवश्यक आहे. सॅनिटायझेशन चालू असताना, जसे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी 1975मध्ये शेख अब्दुल्लाला काश्मीरमध्ये अटक करून पार दक्षिणेला उटकमंडमध्ये नेऊन डांबले होते, त्याप्रमाणे काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी/जिहाद समर्थक राजनेत्यांना अटक करून लांब नेणे आवश्यक आहे.

काश्मीरमधील  दहशतवादी समर्थक

पाकिस्तानचा जिहादी दहशतवाद, आत्मघातकी हल्ले आणि कॉर्डन ऍंड सर्च व एन्काउंटरदरम्यान पैसे घेऊन दगडफेक करणाऱ्या काश्मिरी तरुणांविरुध्द आता कोणाचा कोणताही मुलाहिजा न ठेवता खंबीर कारवाई सुरू करण्याची वेळ आली आहे. काश्मीर खोऱ्यातील संदिग्ध जिहादी, दहशतवादी, जिहादी समर्थक लोक/जनता, स्लीपर सेल्स आणि प्रसिध्द/अप्रसिध्द फुटीरतावादी राजकारणी या सर्वांची वेसण आवळण्याची घटिका आता आली आहे. त्यासाठी खोऱ्याला 'सॅनिटाइज' करणे आवश्यक आहे. सॅनिटायझेशन चालू असताना, जसे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी 1975मध्ये शेख अब्दुल्लाला काश्मीरमध्ये अटक करून पार दक्षिणेला उटकमंडमध्ये नेऊन डांबले होते, त्याप्रमाणे काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी/जिहाद समर्थक राजनेत्यांना अटक करून लांब नेणे आवश्यक असेल/आहे. त्याचबरोबर संकुचित, व्यक्तिगत आणि/किंवा राजकीय स्वार्थासाठी, हाकेसरशी बीजिंगला आणि/किंवा इस्लामाबादला/कराचीला धावून जाणाऱ्या किंवा मानसरोवर यात्रा करणाऱ्या इतरत्र भारतातील नेत्यांना आणि 'टुकडे टुकडे गँग'लाही वेसण घालणे आवश्यक आहे. भारतीय प्रसारमाध्यमांनीदेखील तारतम्य बाळगणे अपेक्षित आहे. केवळ सनसनाटी वादंग माजवणाऱ्या फुटीरतावादी काश्मिरी नेत्यांना आणि पाकिस्तानी पत्रकार/विचारवंत/निवृत्त सैनिकी अधिकाऱ्यांना 'पॅनेल डिस्कशन'साठी बोलावून टीआरपी वाढवायची की देश हिताकडे लक्ष द्यायचे? हे जर त्यांना ठरवता आले नाही, तर मग देशहितासाठी सरकारला त्यात हस्तक्षेप करावा लागला तर त्यात गैर काहीच नाही. सहिष्णुता दाखवण्याचा अर्थ फुटीरतावादाला फूस/प्रोत्साहन देणे नसते/नाही. जर भारतच एकसंध राहिला नाही, तर सार्वभौमत्वाचे रक्षण कोणी, कशी व का करावे? असा प्रश्नही मग उभा ठाकतो.

अफगाणिस्तानमधील जिहादी यशामुळे शेफारलेला पाकिस्तान, काश्मीर खोऱ्याला भारताचे व्हिएतनाम बनवू इच्छित असला, तरी ते शक्य होणार नाही, कारण काही कट्टर (हार्ड कोअर) जिहादी आणि फुटीरतावादी राजकारणी नेते सोडल्यास बहुतांश काश्मिरी लोकांना पाकिस्तान किंवा भारतामधून बाहेर पडण्यात अजिबात स्वारस्य नाही, हे 1995च्या आणि 71च्या भारत-पाक युध्दावरून स्पष्ट होते. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांच्या बाष्कळ बडबडीवरून हे स्पष्ट होते की 2014मध्ये मोदी सरकारने अंगीकारलेल्या काश्मीर धोरणाला बदलण्याचा काहीच वाव नाही. उलटपक्षी संरक्षणतज्ज्ञांनुसार 'इंडिया नीड टू पुट इन टु प्लेस ए मोअर हार्ड लाइन ऍप्रोच टु प्रेझेंट रेजीम इन इस्लामाबाद बिकॉज, पॉलिटिकल एक्स्पेडियन्सी हॅज सिंक्रोनाइज्ड इटस ऍंटी इंडिया पॉलिसी मोअर मार्केडली विथ दॅट ऑॅफ आर्मी जनरल्स सीटिंग इन रावलपिंडी.' पाकिस्तानी प्रछन्न युध्द धोरणाला आता भारताने पाकिस्तानी मर्मस्थळ असणाऱ्या बलुचिस्तान, सिंध, फ्रंटियर एरियाज आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये नेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण जर पाकिस्तान भारताच्या परसदारी जिहादी सापाची पिल्ले पाळण्यात धन्यता मानत असेल, तर भारतानेही पाकिस्तानची खेळी त्याच्यावर उलटवली पाहिजे. चीनचे भारतीय धोरण कधीही वास्तवाला अनुसरून राहणार नाही. मागील काही काळापासून पाकिस्तान-चीन जोडी भारताविरुध्द सक्रिय झाली आहे. चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या (सीपीईसीच्या) पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या, पूर्वेकडील सीमेच्या रक्षणार्थ (सेफगार्डिंग ईस्टर्न फ्लॅन्क ऑॅफ सीपीईसी), चीनची पीएलए आणि पाकिस्तानी आयएसआय व सेना हे एकमेकांसोबत ठामपणे उभे आहेत. त्यासाठी चीन भारतविरोधी पाकिस्तानी जिहादी दहशतवादाची आणि आत्मघातकी हल्ल्यांची छुपी पाठराखण करतच राहील. मोदी व शी जीनपिंग यांच्या वार्तालापांमुळे निर्माण झालेल्या 'वुहान स्पिरिट'ला फारसे महत्त्व देण्यात अर्थ नाही, कारण सरतेशेवटी चीन हाच भारताचा प्रथम क्रमांकाचा शत्रू आहे, हे आपण विसरून चालणार नाही.

रणनीतीत बदल

लष्करी स्थळांवर हल्ला करण्याऐवजी जिहादी आता 'एकल शिलेदाराची आत्मघातकी हल्ला प्रणाली'कडे (लोन वोल्फ ऍटॅक सिन्ड्रोमकडे) वळलेले दिसून येतात. त्यामुळे सेनेलादेखील आपल्या कार्यप्रणालीमध्ये योग्य तो बदल करावा लागेल. पुलवामाचा हल्ला त्याच पठडीतला होता. पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी पुलवामातील पिंगलियाना गावात लपलेल्या, जैशच्या तीन जिहाद्यांचा खात्मा करण्यात आला. क्रिकेटमध्ये जसा वेगवान गोलंदाज आलटून पालटून स्विंगर्स व बाउन्सर्स टाकतो, त्याचप्रमाणे यापुढे असे एकल शिलेदारी हल्ले नेहमीच्या पारंपरिक जिहादी हल्ल्याच्या जोडीनेच आलटून पालटून होतील, असा अंदाज संरक्षणतज्ज्ञ करत आहेत. याची सुरुवात लेफ्टनंट जनरल के.जे.एस. धिल्लन, सीआरपीएफ आयजी जुल्फिकार हसन, पोलीस आयजी एस.पी. पाणी आणि मेजर जनरल मॅथ्यू यांच्या पत्रकार परिषदेपासून सुरू झाली आहे. अंदाजे 130 भारतीय आणि विदेशी दूरचित्रवहिन्यांच्या पत्रकारांनी या पत्रकार परिषदेला हजेरी लावली. 19 फेब्रुवारी 2019ला श्रीनगरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये 'आम्ही शंभर तासांमध्येच पुलवामाचा बदला घेतला आणि त्यातील जिहाद्यांना 'न्यूट्रलाइज' केले' अस सांगत ले.जनरल धिल्लननी पुढील माहिती/सूचना/इशारे दिलेत - 1) पुलवामा हल्ल्यामागे जैश ए महंमद, आयएसआय आणि पाकिस्तानच आहेत, 2) काश्मिरी मातांनी आपल्या मुलांना जिहादी मार्ग चोखाळण्यापासून रोखावे, जे जिहादी बनले असतील त्यांना परत येण्याची गळ घालावी; कारण यानंतर देशाविरुध्द शस्त्र हाती घेणाऱ्याला अभय नाही, त्याचा तडक खात्मा केल्या जाईल, 3) काश्मीरमध्ये आम्ही सर्व दहशतवाद्यांचा सफाया करू, 4) जैशला तर आम्ही सोडणार नाही, काळ-वेळ पाहून त्यांनाही उद्ध्वस्त करू, 5) 2019मध्ये मारल्या गेलेल्या 31 दहशतवाद्यांपैकी 12 जैश ए महंमदचे होते, 6) या चकमकीत जैशचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत, पण ते कोण होते, कुठून आले, कसे मारले गेलेत, त्यांच्याकडून काय मिळाले याबद्दल आम्ही गुप्तता बाळगणेच पसंत करतो, 7) वाट चुकलेल्या तरुणांसाठी सरकारने चांगल्या योजना सुरू केल्या आहेत, मात्र जिहादी हत्येत सामील असलेल्यांना शरण देणार/गय होणार नाही, 8) या चकमकीत जखमी झालेल्या ब्रिगेडियर हरदीप सिंगनी मिळालेल्या सुट्टीला तिलांजली देऊन ऑॅपेरेशनची कमांड सांभाळली, मेजर पुष्कर दौंडियालही यात शहीद झालेत, यावरून अधिकारी - मग तो कोणत्याही हुद्दयाचा का असेना, सामरिक संकटांना नेहमीच सर्वप्रथम समोर जातो, 9) काश्मिरी युवकांसाठी/मुलांसाठी आम्ही हेल्पलाइन चालवतो आहोत, सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि 10) या ऑॅपेरेशनमध्ये जिहादी सोडून कोणालाही जीवित/वित्तहानी (कोलॅटरल डॅमेज) होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आणि भविष्यातही असेच केले जाईल.

 भारतीय सेनेची ही पत्रकार परिषद संपते न संपते, तोच पाकिस्तानी पंतप्रधान मियाँ इम्रान खान यांनी घाईघाईत घेतलेल्या पत्रकार परिषदेला केवळ सहा मिनिटांसाठी संबोधित केले. पाकिस्तान या दोन्ही हल्ल्यांमध्ये सहभागी नव्हता, आमच्यावर 'बेबुनियाद इल्जाम' लावले जात आहेत, जर आम्हाला पुरावे दिलेत तर आम्ही त्यावर नक्कीच कारवाई करू, आम्ही प्रगतीच्या मार्गावर जात असताना हल्ले का करू, भारताने आम्हाला डिवचू नये, जर आमच्यावर युध्द लादले गेले, तर आम्ही उत्तर द्यायचा केवळ विचारच करणार नाही, तर सडेतोड उत्तर देऊ अशा गमजा इम्रान खान यांनी मारल्या. मात्र पत्रकारांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांना त्यांनी उत्तर न देता पत्रकार परिषदेची सांगता केली. भारताला ही पोकळ धमकी देताना इम्रान खान यांना बहुधा 'भारताची सैनिकी शक्ती माहित असेल म्हणूनच असे केले असेल....

इम्रानी कांगावा

भारतीय सेनेची ही पत्रकार परिषद संपते न संपते, तोच पाकिस्तानी पंतप्रधान मियाँ इम्रान खान यांनी घाईघाईत घेतलेल्या पत्रकार परिषदेला केवळ सहा मिनिटांसाठी संबोधित केले. पाकिस्तान या दोन्ही हल्ल्यांमध्ये सहभागी नव्हता, आमच्यावर 'बेबुनियाद इल्जाम' लावले जात आहेत, जर आम्हाला पुरावे दिलेत तर आम्ही त्यावर नक्कीच कारवाई करू, आम्ही प्रगतीच्या मार्गावर जात असताना हल्ले का करू, भारताने आम्हाला डिवचू नये, जर आमच्यावर युध्द लादले गेले, तर आम्ही उत्तर द्यायचा केवळ विचारच करणार नाही, तर सडेतोड उत्तर देऊ अशा गमजा इम्रान खान यांनी मारल्या. मात्र पत्रकारांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांना त्यांनी उत्तर न देता पत्रकार परिषदेची सांगता केली. भारताला ही पोकळ धमकी देताना इम्रान खान यांना बहुधा 'भारताची सैनिकी शक्ती पाकिस्तानच्या जवळपास चौपट आहे, आण्विक शस्त्रांची संख्या दोघांपाशी जवळपास समानच आहे, भारताकडे अण्वस्त्र नेण्यासाठी क्षेपणास्त्र/विमान/तोफांची वाहन प्रणाली आहे जी पाकिस्तानकडे नाही, भारतीय नौदल जगातील पहिल्या दहा 'ब्ल्यूवॉटर नेव्ही'च्या तोडीचे असल्यामुळे खालच्या दर्जाचे नौदल असणाऱ्या पाकिस्तानच्या सागरी मुसक्या आवळणे भारतासाठी सहज शक्य आहे, भारतामध्ये 100 अब्ज डॉलर्सचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्यामुळे पाकिस्तानला भारताविरुध्द सक्रिय सामरिक पाठिंबा देण्यासाठी चीन त्याला आपल मांडलिकत्व पत्करायला भाग पाडेल, 1999 ते 2016पर्यंत पाकिस्तानने भारताला आण्विक युध्दाची धमकी देत सीमापार करण्यापासून रोखले होते, पण सप्टेंबर 2016मध्ये भारताने तो भ्रमाचा भोपळा फोडून पाकिस्तानवर 'सर्जिकल स्ट्राइक' केला आणि पाकिस्तान त्यावर काहीच न करू शकल्यामुळे आता ती भीतीही राहिली नाही' या गोष्टींची आठवण राहिली नसावी. याआधी जिहाद्यांना समर्थन देणाऱ्या/दगडफेकीत सामील होणाऱ्या तरुण/नागरिकांप्रती सेना व सुरक्षा दल मवाळ भूमिका घेत असत. सरकारनेदेखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आदर राखत, सेनेवर लगाम कसला होता.पण आता मोदींनी सेनेला सामरिक कारवाईचे सर्वाधिकार दिले आहेत. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यास सर्वसामान्य काश्मिरी जनता त्याला पाठिंबा देईल या आशेने जनरल अयूब खाननी 1965मध्ये आणि जनरल याह्या खाननी 1971मध्ये युध्दाची दुंदुभी वाजवली. 1980मध्ये जनरल झिया उल हकनी काश्मिरातील घुसखोरीचे ऑॅपरेशन टोपाझ आणि जनरल मुशर्रफनी 1999चे कारगिल 'मिस ऍडव्हेन्चर' सुरू केले. लेफ्टनंट जनरल के.जे.एस. धिल्लननी ''जो कोणी भारताविरुध्द शस्त्र हाती घेईल, त्याला खतम करण्यात येईल'' असे कडक, कठोर निर्देश दिल्यामुळे 'आता आपला 'लोकल सपोर्ट' संपणार तर नाही ना?' या धडकीमुळे हादरलेल्या इम्रान खान यांनी ही पत्रकार परिषद घेतली असावी, असे मानायला बराच वाव आहे.

हल्ल्याचे पर्याय

भारताकडे पाकिस्तानवर हल्ला करण्याचे कोणते पर्याय आहेत याचा विचार करता, 1) मागील सर्जिकल स्ट्राइकसारखे तीन-चार किलोमीटर्स सीमेच्या आत जाऊन पाकिस्तानचे 'लाँचिंग पॅड' उद्ध्वस्त करणे, 2) बोफोर्स/धनुष 130 मि.मी. तोफांनी 30-40 किलोमीटर्स आत असलेले ऍडव्हान्स जिहादी कॅम्प्स उद्ध्वस्त करणे, 3) मध्यम पल्ल्यांच्या क्षेपणास्त्राद्वारे 100-120 किलोमीटर्स आत असलेली प्रशिक्षण केंद्रे जमिनीवरून मारा करत उद्ध्वस्त करणे, 4)आपल्या हद्दीत राहून 'स्टँड ऑॅफ डिस्टन्स'वरून क्षेपणास्त्रांचा मारा करत, 250-300 किलोमीटर्स आत असलेली जिहादी मुख्यालय उद्ध्वस्त करणे, 5) जी-सॅट 7ए उपग्रहाच्या आणि रिसर्च ऍनालिसिस विंगच्या (रॉच्या) मदतीने जैश ए महंमदच्या आणि लष्कर ए तायबाच्या म्होरक्यांचा ठावठिकाणा माहीत करून, काळवेळ पाहून 76 सैनिक नेण्याची क्षमता असलेली, नव्याने भारतीय वायुदलात आलेली चिनुक 'हेवी डयुटी ट्रान्स्पोर्ट हेलिकॉप्टर्स' आणि त्याच्या रक्षणार्थ मिसाइल नेण्याची क्षमता असलेली 'अपॅची हेलिकॉप्टर्स' यांच्या मदतीने त्या लपण्याच्या ठिकाणांवर कमांडो हल्ला करून त्यांचे अपहरण/वध करणे (ला अमेरिकन ऍक्शन इन अबोटाबाद टू किल ओसामा बिन लादेन) आणि 6) पाकिस्तानशी सर्वंकष युध्द करणे, हे सहा पर्याय उपलब्ध आहेत असे दिसून येते. हे जगमान्य पर्याय असल्यामुळे यांची चर्चा करणे देशहिताविरुध्द असणार नाही. अशा ऑॅपरेशन्समध्ये कमांडोंची व विमानांची संख्या, त्यांचे प्रकार व शस्त्रास्त्रे, माऱ्याचे स्थळ आणि काळवेळ ही महत्त्वाची असतात. पुलवामा हल्ल्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑॅन सिक्युरिटी आणि नंतर सर्वदलीय बैठक झाली. सीसीएसने कोणता पर्याय निवडला आहे हे जरी गुलदस्त्यात असले, तरी त्यानंतर पंतप्रधानांच्या ''सेनाको ऍक्शन लेनेकी पूरी छूट दी गई है'' या प्रतिपादनातून येणाऱ्या सैनिकी व सामरिक हालचालींचा थोडासा मागोवा घेता येतो. भारतीय संरक्षण दल या कसोटीवर खरी उतरतील यात कुठलीही शंका, कोणाचंही दुमत नाही. सरकारच्या या कारवाईला सर्व राजकीय पक्षांचा - निदान वरकरणी तरी - पाठिंबा आहे, हेदेखील स्पष्ट होते.

प्रछन्न युध्दाच्या माध्यमातून भारताला रक्तबंबाळ करणारा पाकिस्तान असो किंवा भारतावर हल्ला करवणाऱ्या तेथील जिहादी नेत्यांना संयुक्त राष्ट्र संघात आपल्या पाठीशी घालणारा चीन असो, या बाबतीत कुठलाही अनाठायी अनुनय, अकारण लांगूलचालन किंवा अर्धवट उत्तर काढणे/शोधणे देशहिताचे नाही. आपले सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय अस्मिता अबाधित राखायची असेल, तर सर्वंकष युध्दासाठी लवकरात लवकर तयारी करणे आणि सामरिक शक्ती वृध्दिंगत करणे अत्यावश्यक आहे. यामध्ये हलगर्जीपणा करणे म्हणजे सामरिक संकटांना स्वतःहून आमंत्रण देण्यासारखे असेल.

- कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

abmup54@gmail.com

सौजन्य - साप्ताहिक विवेक

 

लेखक: 

No comment

Leave a Response