Primary tabs

नया है यह!

share on:

प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही व्हॉट्सअ‍ॅपने होते आणि दिवसाचा शेवटही. व्हॉट्सअ‍ॅप बनविणारेही फार हुशार आहेत. माणसाच्या भावनांचा वापर करत ते नवनवे फीचर आणत असतात. आधी त्यांनी माणसाच्या भावना इमोजीच्या रूपात आणल्या, फ्री फोन कॉलची सुविधा आणली पण, सध्या चर्चेचे विषय बनलेत ते व्हॉट्सअ‍ॅपने जाहीर केलेले दोन बदल...

याआधी व्हॉट्सअ‍ॅपने फेकन्यूजला आळा घालण्यासाठी, पाचपेक्षा जास्त लोकांना एक मजकूर पाठवू शकत नाही, असं जाहीर केलं आणि आता त्यांनी ग्रुप व्हिडिओ कॉलिंग हे नवीन फीचर सुरू केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपने याआधी ऑडिओ कॉलिंग फीचर सुरू केलं होतं. आता ग्रुप व्हिडिओ कॉलिंग फीचर सुरू करत व्हॉट्सअ‍ॅपने एक पाऊल पुढे टाकलं आहे. आपल्या यूजर्सना काय हवंय, हे पाहून व्हॉट्सअ‍ॅप सतत नवनवे प्रयोग करत आलाय. जगभरातील आयओएस आणि अँड्रॉईड युजर्स या नव्या सुविधेचा वापर करू शकतात. नेहमीप्रमाणे याचा वापर करणं फार काही कठीण नसल्यामुळे घरातील सगळी मंडळी याचा मनसोक्त वापर करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉलिंगच्या माध्यमातून एकाच वेळी चार व्हॉट्सअ‍ॅप युजर्स व्हिडिओ चॅट करू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी हायस्पीड इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे अगदी तुम्ही कुठेही असाल तरी ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करू शकता. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला आधी एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून, त्यानंतर आणखी दोघांना यात सामील करू शकता. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही एकाचवेळी चार लोकांशी बोलू शकता. जगातील जवळजवळ 150 कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात आणि भारत यात आघाडीवर आहे. या फीचरमुळे तुम्ही लांबच्या नातेवाईकांशी मनमोकळ्या गप्पा मारू शकता. भारतीयांना या नवीन फीचरचा नक्कीच फायदा होईल, परदेशी असलेल्या नातेवाईकांशी होणारा संवाद आता एकाचवेळी होऊ शकतो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉलिंगच्या माध्यमातून बाहेरगावी असणाऱ्यांना सगळे सण, कार्यक्रम आपल्या कुटुंबासोबत डिजिटली साजरे करणं शक्य होणार आहे. आपलं महत्त्वाचं मार्केट म्हणून व्हॉट्सअ‍ॅप भारताकडं पाहतं. त्यामुळे त्यांची मानसिकता ओळखूनच हा बदल करण्यात आला असावा. हे फीचर किती काळ टिकेल, याची जरी शाश्वती नसली तरी त्याचा गैरवापर होता कामा नये, एवढी मात्र इच्छा आहे.

- प्रियांका गावडे

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response