Primary tabs

नाती समजून घेताना...

share on:

नचिकेतला घरी जाण्याच्या कल्पनेनेच अंगावर काटा यायचा. घरी गेलं की, आईवडिलांची भुणभुण सुरू व्हायची. त्याच्या वागण्यावरून, पैसे खर्च करण्यावरून, मित्रांवरून, हॉटेलिंगवरून त्याला टोमणे ऐकावे लागायचे. आपण कस जगावं, काय करावं हे ठरवण्याचा अधिकार दुसऱ्यांना कसा काय असू शकतो, ह्या विचाराने त्याचा संताप व्हायचा. आई-वडील निवडण्याचा अधिकार कोणालाच नसतो. त्यामुळे आहे ते सहन करण्यापलीकडे आपल्या हातात काही नाही याचं त्याला वैषम्य वाटायचं. घर हे घरातल्या सदस्यांना एकमेकांच्या प्रेमाच्या नात्यात बांधून ठेवणार असत, पण त्या घरात आज नाती उसवत चालली होती, माणसं दुरावत होती. एकमेकांशी बोलण फक्त कामापुरात राहील होत. मनातल्या भावना, विचार शेअर करणं लांबच राहील. काय करावं असा प्रश्न नचिकेतलाच नव्हे तर त्याच्या आई-वडिलांनासुद्धा पडला होता.

मित्रांनो, आपण १५-१६ व्या वर्षात आल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागत की, आपलं स्वत:चं असं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. आपल्यालाही आपले विचार आहेत, मतं आहेत. आतापर्यंत आपण आईवडीलांच म्हणन ऐकत असतो. त्यांची मतं मान्य करत असतो. किंबहुना त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला पटते. पण तारुण्यात प्रवेश केल्यानंतर मतभेद होतात, वाद-विवाद होतात, नात्यात अंतर पडत जात. आपण स्वावलंबी झाल्याने नात्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. एक प्रकारच मालकीपण येतं. मोठं होणं म्हणजे फक्त वर्चस्व गाजवणं असतं; स्वातंत्र्य असतं असं वाटायला लागतं. त्याच्या बरोबर असते, जबाबदारी, कुटुंबाचे प्रमुखपद. हेच कळायला हव, मुलगा असो की मुलगी. तरुण या नात्याने घर आपल्या प्रेमाने बांधून ठेवायचं असत.

नात कोणतही असल तरी प्रत्येकजण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतो. प्रत्येकाचा स्वभाव, भावना, वृत्ती वेगवेगळ्या असतात. हे प्रथम मान्य करायला हव. आई वडील आपल्याला हवे तसे वागवत नसले तरी प्रथम स्वीकार व्हायला हवा. कारण त्याची दुसरी बाजू त्यांनी तुम्हाला जसे आहात तसं मान्य केलच, अॅक्सेप्ट केलंय. तुमच्या हातून होणाऱ्या चुकांना सावरलंय. तुमच्या यशाचं कौतुक केलंय. तुम्ही म्हणाल म्हणून त्यांचा स्वभाव या वयात बदलू शकत नाही. आपल्या आई-वडिलांचं म्हणण शांतपणाने ऐकून घेण हा दुसरा टप्पा. ‘यु शुड बी अ गुड लीसणर’. समोरच्याच म्हणण ऐकून घेण्याने दोन व्यक्तींमधल्या नात्यात समंजसपणा यायला लागतो. मला असं वाटत हेही नंतर सांगायला काहीच हरकत नाही, मत जरूर ऐकवा.

आपल्यापेक्षा एक पिढी आधी या जगात आलेले, वेगळे संस्कार आणि वेगळ्या सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या आपल्या पालकांचा जगण्याकडे/जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असणारच पण त्यांचा अनुभव हाही विचारात घ्यायला हवा. जेव्हा रागावून, त्रागा करून, तुमच्या दृष्टीने कटकट करत ते तुमच्याशी बोलतात तेव्हा फक्त एक प्रश्न स्वत:च्या मनाला विचारा की, ‘कोणते आई-वडील मुलांच्या वाईटाकरता बोलतात?’ उत्तर नक्कीच मिळेल, ‘कोणतेही नाही’. मग जे आपल्या भल्यासाठी, आनंदासाठी, यशासाठी काही म्हणत असतील. आपल्यातील गुणांना प्रोत्साहन देत असतील, एक्स्पोजर मिळाव म्हणून धडपड करत असतील तर त्यातला भाव समजून घ्या. आपली मूळ आणि आपले पंख त्यांनीच आपल्याला दिले आहेत हे विसरू नका म्हणूनच जे त्यांना बोलून दाखवता येत नाही तेसुद्धा ऐकता आलं पाहिजे.अखेरीस शिक्षण घेण म्हणजे फक्त डिग्री, नोकरी आणि छोकरी नव्हे तर नातीही सांभाळता आली पाहिजे. तुमची श्रीमंती तुमच्याजवळ असलेल्या पैशाने नव्हे तर तुमच्या पालकांच्या प्रेमावर आणि आशीर्वादावर ठरत असते.

एकट्याने जगल तर मग नात्यांची गुंतागुंत उरणारच नाही. पण खरंच एकट जगता येत का? जगावं का? नात्यांची वीण घट्ट बांधावी आणि त्याच्या उबदारपणात येणारी सुख, दु:ख, माया-ममता, लोभ-मोह आवरणं, सावरण सार सार लपेटून घ्यावं. नात्यातली आपुलकी आदर, विश्वास, सुरक्षितता हे सार फक्त आणि फक्त आई- वडिलांकडूनच मिळत असत. घेण्यापेक्षा देण्यात किती सुख, किती समाधान असत आणि ते मनाला सुखावत हे अनुभवलंत तरच त्याचा प्रत्यय यईल. म्हणून आई-वडील हे नात जणू पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीशी वारकऱ्यांच्या असलेल्या नात्यासारख आहे. ते जितकं प्रेमाच्या ओढीच तितक अधिक दृढ होत जाईल.

- डॉ. स्वाती गानू

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response